रिद्धपूर ग्रामपंचायतीमध्ये कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:12 AM2021-01-21T04:12:50+5:302021-01-21T04:12:50+5:30
रिद्धपूर : गावातील सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने २० जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन बुधवारी ...
रिद्धपूर : गावातील सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने २० जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन बुधवारी करण्यात आले.
तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत महाजन यांच्या नेतृत्वात वैद्यकीय चमूने शिबिरात कोरोनासंबंधी चाचणी केली. रॅपिड अँटिजन चाचणीद्वारे २३ जणांची तपासणी करण्यात आली. ४७ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. प्रयोगशाळा वैज्ञानिक दिनेश भगत, जितेश ढेवले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हातगुडे यांनी कोरोनासंबंधी नमुने घेऊन ते अमरावती येथील चाचणी केंद्रात पाठविले. या शिबिरासाठी रिद्धपूर येथील आरोग्यसेवक रवींद्र मालवे, संदीप ठवरे यांनी सहकार्य केले. सरपंच गोपाल जामठे, ग्रामपंचायत सदस्य सचिन डवके, माजी उपसरपंच गोविंदराव वानखडे, सामाजिक कार्यकर्ते राजू चव्हाण व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.