चांदूर रेल्वेत अकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:12+5:302021-05-23T04:12:12+5:30
चांदूर रेल्वे : शहरात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर काही प्रमाणात गर्दी आटोक्यात आली ...
चांदूर रेल्वे : शहरात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर काही प्रमाणात गर्दी आटोक्यात आली होती. ही मोहीम प्रभारी ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात आरोग्य व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या स्थानिक जुना मोटार स्टँड येथे राबविली.
या मोहिमेसाठी पोलिसांकडून जाणाऱ्या - येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात होती. जे विनाकारण बाहेर आले त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यात १३ लोकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. सर्व लोकांचा अहवाल निगेटीव्ह आला.
यावेळी सहायक ठाणेदार गीता तांगडे, वाहतूक पोलीस कर्मचारी भूषण वंजारी, पोलीस कर्मचारी अरविंद गिरी, अरुण भुरकाडे, मनोज वानखडे, होमगार्ड, आरोग्य विभागाचे नंदकिशोर खरात, चालक त्रिशूल नरखेडकर, आरोग्य सेविका वैशाली भोवते, सारिका पवार आदी उपस्थित होते.