बाजार समितीमध्ये भाजी विक्रेत्यांसह कामगारांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:13 AM2021-04-21T04:13:32+5:302021-04-21T04:13:32+5:30
अमरावती : कोरोनाचा संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यातंर्गत मंगळवारी येथील बाजार समितीच्या जुन्या ...
अमरावती : कोरोनाचा संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यातंर्गत मंगळवारी येथील बाजार समितीच्या जुन्या कॉटन मार्केटमध्ये ३६९ भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन भाजी विक्रेत्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
महापालिकेचे उपायुक्त रवि पवार यांनी कृषिउत्पन्न बाजार समितीत पाहणी करून व्यापारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ कोरोना चाचणी करून घेण्याच्या यावेळी दिल्या. ज्या व्यापारी-कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केली नाही, त्यांचे दुकान सील होऊ शकते , अशी तंबी दिली व सर्व भाजी विक्रेत्यांना चाचणी करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता २ सुहास चव्हाण, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता प्रमोद इंगोले, डॉ. संदीप पाटबागे, डॉ .देवेंद्र गुल्हाने, अभियंता दिनेश हंबर्डे, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ निरीक्षक धनिराम कलोसे, प्रशांत गावनेर, प्रीती दाभाडे, महेश पळसकर, मनीष हडाले, अविनाश फुके, मनिष खंडारे, नितीन भेंडे, विष्णू लांडे आदी उपस्थित होते.