कोरोना लसीकरण केंद्र हलवण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:21+5:302021-06-04T04:11:21+5:30
स्थानिक येवदा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये कोरोना लसीकरण केंद्र शासनाने सुरू केले होते. परंतु मध्ये लसीकरण केंद्राची जागा बदलून ...
स्थानिक येवदा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये कोरोना लसीकरण केंद्र शासनाने सुरू केले होते. परंतु मध्ये लसीकरण केंद्राची जागा बदलून काशीबाई अग्रवाल विद्यालय येवदा येथे स्थानांतरित केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र येवदा इमारत ही शासनाने नवीन बांधलेली असून त्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्धता व आरोग्य अधिकाऱ्याच्या देखरेख दृष्टीने सर्व सोयींयुक्त आहे .असे असतांना काशीबाई अग्रवाल विद्यालय च्या इमारतीवर टिन शेड असल्याने लस्सी करण्यासाठी येणाऱ्या जनतेला उष्णता मानाचा जास्त त्रास होत. असल्याने तसेच सदर लसीकरण केंद्रावर लसीकरणानंतर नागरिकांना आकस्मिक औषधोपचार करण्याच्या दृष्टीने कुठलीही व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास बाधा होऊ शकते त्यामुळे लोकांच्या संयुक्त बांधलेली प्राथमिक आरोग्य केंद्र येथील जागेतच लसीकरण केंद्र सुरू करावे. जेणेकरून सर्व नागरिकांच्या आरोग्यास कुठलेही उपाय होणार नाही .अशा अनुषंगाने येवदा येथील ग्रामपंचायत च्या मासिक सभेमध्ये ठराव घेण्यात आला आहे. या समस्येबाबत संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .