नांदगावात कोरोना लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:39+5:302021-02-10T04:13:39+5:30
फोटो पी ०९ नांदगाव नांदगाव खंडेश्वर : येथील ग्रामीण रुग्णालयात करोना लसीकरण मोहिमेच्या पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. ...
फोटो पी ०९ नांदगाव
नांदगाव खंडेश्वर : येथील ग्रामीण रुग्णालयात करोना लसीकरण मोहिमेच्या पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, सफाई कामगार, पंचायत समितीचे कर्मचारी आदींना लस देण्यात आली. तालुक्यातील सुमारे ४०० लाभार्थींना लसीकरणाचे डोज देण्यात आले.यात गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव इंगळे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीणा देशमुख, बाल विकास अधिकारी वीरेंद्र गलफट यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लस घेतली. या मोहिमेचा प्रारंभ ३ फेब्रुवारीपासून करण्यात आला.
-------------------------------
भातकुलीचा जागृती महिला मेळावा
भातकुली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने भातकुली तालुका जागृती महिला मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुल राऊत होते. सदानंद रेवाळे, राजेश सावरकर, उमेश चुनकीकर, प्रफुल्ल वाठ, गजानन कासमपूरे, विनिता घुलक्षे, ज्योत्स्ना शेटे, ज्योती गायकी, उज्वला राऊत, अर्चना सावरकर, संगीता चुनकीकर उपस्थित होत्या.