शंकरबाबांच्या ऐंशी दिव्यांग मुलांना कोरोना व्हॅक्सिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:33+5:302021-06-10T04:10:33+5:30
देशातील जनतेला कोरोना लस मोफत मिळणार, त्यातही दिव्यांगांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. त्याआधारे ...
देशातील जनतेला कोरोना लस मोफत मिळणार, त्यातही दिव्यांगांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. त्याआधारे जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूला आदेश दिले. त्यानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर बेवारस बालगृहातील ८० दिव्यांग प्रवेशितांना कोविड-१९ लसीकरण केले. यावेळी जिल्हा शल्यचिकत्सक श्यामसुंदर निकम व अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार उपस्थित होते.
बॉक्स
पुष्प देऊन दिव्यांगांचे स्वागत
उपस्थित डॉक्टर व परिचारिका यांनी मुलांचे फूल देवन स्वागत केले व लसीकरणास सुरवात केली. दुपारी २ पावतो लस देण्यात आली. मिरगी येणाऱ्या मुलांना व इतर मुलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात लस देण्यात येणार आहे. डॉ. नेहा भुलोडे, डॉ. सुधीर माहुरे, देवेंद्र संभे, संजय खाकसे, मोनिका आढोले, परिचारिका मुक्ता केंद्रे, बालगृहाच्या अधीक्षक प्रमीला नघाटे, वर्षा काळे आदी यावेळी उपस्थित होते.
कोट
मागील दीड वर्षांपासून एकही दिव्यांग मुलाला कोरोनाचा आजार होऊ नये, यासाठी सर्वतोपरी दक्षता घेतली. आता लसीकरण होत असल्याने बरीचशी चिंता कमी झाली आहे. सर्वांनी सुरक्षित अंतर बाळगावे व मास्क बांधावा.
- डॉ. शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक, वझ्झर