कोरोना विषाणूचा लग्नसराईला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:20+5:30
मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वत्र लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात २१ दिवस लॉकडाऊन असल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुड्याचे नियोजन विस्कटले आहे. अधिक लोकांना एकत्र जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणवाडा थडी: देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केल्याने खरेदीपासून पत्रिका तयार करणे ती वाटप करण्याचे नियोजन कोलमडले. त्यामुळे अनेक ठिकाणी लग्नसोहळा पुढे ढकलण्यात येत आहेत. जेवणावळीसाठी आचारी मिळत नसल्याने वाढपी नसल्याने लग्न कशी उरकावयाची, असा प्रश्न वधप-वर मंडळींना पडला आहे.
मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वत्र लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात २१ दिवस लॉकडाऊन असल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुड्याचे नियोजन विस्कटले आहे. अधिक लोकांना एकत्र जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.
लहान-लहान गावांतील वधु-वर एकत्र येत लग्नसराईची खरेदी करतात. शहरासह, तालुकास्तरावर अनेक ठिकाणाहून होलसेल साड्यांचा बसता वर- वधुचे कपडे, दागिने, भांडी आदींची एकदम खरेदी करीत असतात. मात्र, शहरासह ग्रामीण भागातही लॉकडाऊन असल्याने तसेच वाहने बंद असल्याने ही खरेदी रखडली आहे. लग्न म्हणजे भरपूर खरेदी नातेवाईकांत जल्लोषाचे वातावरण असते. पण कोरोनाचे संकट सर्व देशभरात पाय पसरू लागले आहे. त्यांमुळे सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जीवनाश्यक सोडून इतर सर्व वस्तूंची दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश धडकले आहे. ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमा येण्यास मज्जाव केल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ व साखरपुड्याचे वेळापत्रक विस्कटले आहे. काहींनी हे समारंभ पुढे ढकलले, तर काहीजण मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकू न घेत आहेत. बरेचदा इतर वेळी भरपूर खरेदी आणि नातेवाईकांच्या उपस्थित होणारे हे समारंभ सध्या थंडबस्त्यात आहेत.
मुहूर्त बदलूनही ऐनवेळी टळले
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाने लॉकडाऊनसह संचारबंदी लागू केली आहे. परिणामी ज्या कु टुंबाकडे विवाह व साखरपुडा समारंभाचे आयोजन केले होते. अशा काही मंडळीने सुरूवातीला मार्च व त्यानंतर एप्रिल महिन्यातील विवाह व साखरपुड्याचे मुहूर्त काढले. परंतु, कोरोनामुळे एक नव्हे तर दोनदोन वेळा मुहूर्त रद्द करावा लागला. यशिवाय बाजारपेठ बंद असल्याने विवाह समारंभाची खरेदीही बारगळल्याचे वर-वधू पित्यांकडून सांगण्यात येत आहे.