नांदगाव तालुक्यातील १४ गावांनी कोरोनाला सीमेवरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:09+5:302021-07-19T04:10:09+5:30

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील १४ गावांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सीमेवरच रोखले. या गावांनी पहिल्या लाटेतही कोरोनाचा शिरकाव गावात होऊ ...

Corona was stopped at the border by 14 villages in Nandgaon taluka | नांदगाव तालुक्यातील १४ गावांनी कोरोनाला सीमेवरच रोखले

नांदगाव तालुक्यातील १४ गावांनी कोरोनाला सीमेवरच रोखले

Next

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील १४ गावांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सीमेवरच रोखले. या गावांनी पहिल्या लाटेतही कोरोनाचा शिरकाव गावात होऊ न दिल्याने त्यांच्यासाठी ही बाब या गावासाठी गौरवाची ठरली आहे.

१३२७ लोकसंख्येचे वडुरा, ५२५ लोकसंख्येचे धानोरा शिक्रा, खीरसाना ग्रामपंचायत अंतर्गत ४९३ लोकसंख्येचे निरसाना, पुसनेर ग्रामपंचायत अंतर्गत ३४५ लोकसंख्येचे सुलतानपूर, खानापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारे ३४३ लोकसंख्येचे जगतपूर, सिद्धनाथपूर ग्रामपंचायत अंतर्गत ३३१ लोकसंख्येचे चाकोरा, खेड पिंप्री ग्रामपंचायत अंतर्गत पिंप्री पोच्छा, खानापूर ग्रामपंचायत अंतर्गत मलकापूर, लोहगाव ग्रामपंचायत अंतर्गत उंदीरखेडा, सालोड ग्रामपंचायत अंतर्गत ढंगाळा, पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायत अंतर्गत माळेगाव, पुसनेर ग्रामपंचायत अंतर्गत बोरगाव, एरंडगाव ग्रामपंचायत अंतर्गत दादापूर तसेच शेलुगुंड ग्रामपंचायत अंतर्गत हिंगलासपूर या गावात अद्यापही कोरोनाचा शिरकाव झाला नाही.

या गावांनी लॉकडाऊनच्या कालखंडात खबरदारी म्हणून बाहेरून येणाऱ्यांना गावबंदी, बाहेरून गावात पाहुणे मंडळी आली तर त्यांचे वेगळ्या कक्षात विलगीकरण, मास्कचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी, हात धुण्याची सवय व वाफारा सप्ताहाची काटेकोर अंमलबजावणी केली व कोरोना विषय जनजागरणावर भर दिला होता.

--------------

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावकरी मंडळी, कोरोना ग्राम दक्षता समितीचे पदाधिकारी, विविध विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागाची यंत्रणा यांच्या परिश्रमाने हे शक्य झाले.

- विनोद खेडकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर

180721\img-20210718-wa0014.jpg

लॉक डाऊनच्या कालखंडसुलतानपूर गावाने बाहेरच्यांना केली होती गाव बंदी.

Web Title: Corona was stopped at the border by 14 villages in Nandgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.