कोरोनानंतरचे साइड ईफेक्टस वाढले; औषधे काळजीपूर्वक घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:13+5:302021-05-14T04:13:13+5:30

वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात, समतोल आहार आणि व्यायाम करा अमरावती : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तसेच ...

Coronary side effects increased; Take medication carefully! | कोरोनानंतरचे साइड ईफेक्टस वाढले; औषधे काळजीपूर्वक घ्या!

कोरोनानंतरचे साइड ईफेक्टस वाढले; औषधे काळजीपूर्वक घ्या!

Next

वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात, समतोल आहार आणि व्यायाम करा

अमरावती : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तसेच कोरोनामुक्तीचा टक्काही समाधानकारक आहे. असे असले तरी काहींना घरी गेल्यानंतरही त्रास होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अशा रुग्णांनी तात्काळ वैद्यकीय तज्ज्ञांना सल्ला घेण्याची गरज आहे. कोरोनामुक्त झाले तरी समतोल आहार आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी दिले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ हजार ५४८ झाली आहे, तर कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ६६ हजार ५२७ आहे. यातील काही रुग्णांना घरी गेल्यावरही त्रास जाणवत आहे, तसेच काही लोकांना कोरोनानंतरचे साइड इफेक्टस्‌ जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा लोकांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी उघडण्यात आलेली असून, येथे डॉक्टरांचीही नियुक्ती केली आहे. असे असले तरी नागरिकांनी आहारासोबत व्यायाम करणेही आवश्यकच आहे, तसेच फळ, कडधान्य, हायप्रोटीन आहार घेणे आवश्यक आहे.

---------------------

बॉक्स

वैद्यकीय तज्ज्ञांचा घ्या सल्ला

१) कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपल्याला काही त्रास होत असेल, तर तात्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पोस्ट कोविडनंतरच्या आजारामुळेही अनेकांचा जीव गेल्याची उदाहरणे आहेत.

२) त्यामुळे थोडाही त्रास जाणवायला सुरुवात झाल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात अथवा खासगी दवाखान्यात दाखवावे.

३) संबंधित डॉक्टरांना सर्व माहिती देऊन आजाराबद्दल सांगावे. यामुळे त्यांना उपचार करणे सोपे जाईल. मनात कसलाही गैरसमज न आणता आणि भीती न बाळगता औषधे घ्यावीत. पोस्ट कोविड रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे.

-----------

बॉक्स

काय होतात परिणाम?

- कोरोनाबाधित रुग्णाच्या फुप्फुसावर परिणाम होतो. त्यामुळे दम लागणे, ब्लड प्रेशर व शुगर वाढते.

- या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने थकवा जाणवतो, तसेच रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते.

- या सर्व गोष्टींचा विचार करून डॉक्टरांनी दिलेली औषधे पोस्ट कोविडमध्येही वेळेवर व नियमित घेणे आवश्यक आहे. आहार आणि व्यायामही करावा.

---------------------

कोट

काय काळजी घ्यायची

कोरोनामुळे फुप्फुसावर परिणाम होतो. त्यामुळे दम लागणे, शुगर व ब्लड प्रेशरही वाढते, तसेच पोस्ट कोविडमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराच्या केसेस वाढल्या आहेत. या सर्वांपासून बचावासाठी समतोल आहार आणि व्यायाम करवा, झिंग व व्हिटॅमिन सी, डीच्या गोळ्या घ्या.

-श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

------------

कोरोनामुक्त झाले, तर काळजी घ्यावी, अशक्तपणा, सांधेदुखी जाणवते. त्यामुळे आराम करावा, तसेच जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. थोडाही त्रास जाणवला, तर अंगावर न काढता वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. हाय प्रोटीन आहार आणि कडधान्य जास्त खावे. डॉक्टरांच्या संपर्कात राहावे.

-डॉ. अतुल यादगिरे, अमरावती

Web Title: Coronary side effects increased; Take medication carefully!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.