कोरोनाचा आलेख वाढताच, रविवारी पुन्हा १९२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:12 AM2021-02-08T04:12:48+5:302021-02-08T04:12:48+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख वाढतच आहे. रविवारी पुन्हा १९२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. विशेषत: अमरावती शहरात संक्रमित रुग्णसंख्या आढळत ...
अमरावती : कोरोना संसर्गाचा आलेख वाढतच आहे. रविवारी पुन्हा १९२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. विशेषत: अमरावती शहरात संक्रमित रुग्णसंख्या आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. मार्च २०२० पासून तर आतापर्यंत जिल्ह्यात २३ हजार ५८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ४२३ संक्रमित रुग्णांना प्राण गमवावे लागले.
नवीन वर्षात जानेवारीपासून कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज तीन अंकांत आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. सोमवारपासून महापालिका प्रशासनाने कोरोना जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे, कोरोना लस येताच प्रशासानासह नागरिकही बिनधास्त वागत आहेत. परिणामी संक्रमितांची आकडेवारी दिवसागणिक वाढत आहे. गत ३८ दिवसांपासून कोरोना चाचणीसाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची लॅब, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व इतर प्रयोगशाळांतून चाचण्यांचे अहवाल प्राप्त होत आहे.
रविवारी दिवसभरात १९२ संक्रमित आढळले, तर ३९३ कोरोनाग्रस्त उपचारासाठी दाखल आहेत. आतापर्यंत महापालिका क्षेत्रात ३०९८, ग्रामीण भागात १६८८ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. ॲक्टिव्ह ४६३ रुग्ण असृून, आतापर्यंत एकूण १ लाख ८४ हजार ९८० नमुने तपासण्यात आले आहेत.