कोरोनाचे विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:35 AM2021-02-20T04:35:38+5:302021-02-20T04:35:38+5:30

फोटो पी १९ चिखलदरा फोेल्डर मेळघाटात स्थलांतरित विद्यार्थी परतू लागल्याने कोरोनाचा धोका! ना आरोग्य तपासणी, ना कुणाला माहिती : ...

Corona's special | कोरोनाचे विशेष

कोरोनाचे विशेष

Next

फोटो पी १९ चिखलदरा फोेल्डर

मेळघाटात स्थलांतरित विद्यार्थी परतू लागल्याने कोरोनाचा धोका!

ना आरोग्य तपासणी, ना कुणाला माहिती : कोरोना वाहक तर नाही?

नरेंद्र जावरे

चिखलदरा : शिक्षण सम्राटांनी संस्था वाचविण्यासाठी नेलेले मेळघाटातील विद्यार्थी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच परत आणून सोडले जात आहेत. कुठल्याच प्रकारची आरोग्य तपासणी व प्रशासनाला माहिती न देताच हे विद्यार्थी गावी आणून सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यातून परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविला जात आहे.

अमरावती व इतर जिल्ह्यांतील विविध शाळांमध्ये संस्था वाचविण्यासाठी मेळघाटातील विद्यार्थ्यांची संस्थाचालक मोठ्या प्रमाणात पळवापळवी करतात, तर काही विद्यार्थी शासकीय शाळांमध्ये इतरत्र जातात. अनलॉकमध्ये शाळा सुरू होताच तालुक्यातील काटकुंभ, पाचडोंगरी, गांगरखेडा व इतर खेड्यांतील विद्यार्थी दर्यापूर तालुक्यातील सामदा व जिल्हाभरातील अनेक शाळा-महाविद्यालये आणि वसतिगृहांत गेले होते. जिल्ह्यात आताचा कोरोनाचा कहर पाहता, प्रशासनाने शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यावर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी वाहनांमध्ये भरून आणून सोडले जात आहे. यादरम्यान त्यांची वैद्यकीय तपासणी किंवा प्रशासनाला माहिती दिली जात नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. कोरोनाचा कहर पाहता, मेळघाटात नागरिकांमध्ये भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बॉक्स

वर्षभरात ११४ पॉझिटिव्ह

चिखलदरा तालुक्यात तूर्तास चार जण अ‍ॅक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. वर्षभरात आतापर्यंत ११४ कोरोना रुग्णांची नोंद झाली. मृत्यू मात्र एकही नाही. चिखलदरा आणि टेंब्रुसोंडा येथे दोन कोविड तपासणी केंद्रे उघडण्यात आली आहेत.

बॉक्स

शेकडो आदिवासी स्थलांतरित, नाक्यावर तपासणी

तालुक्यातील आदिवासी मोठ्या प्रमाणात शहरी भागात रोजंदारीच्या कामावर स्थलांतरित झाले आहेत. त्यासंदर्भातील यादी आरोग्य यंत्रणेमार्फत गावागावांत जाऊन तयार केली जात असून, महसूल प्रशासनाला त्यासंदर्भात वारंवार माहिती दिली जात आहे. हे आदिवासी शहरी भागातून आल्यावर कोरोनावाहक ठरू नये, यासाठी नाक्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी स्पष्ट केले.

-----------------------

फोटो पी १९ परतवाडा आठवडी बाजार

परतवाड्यात जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला हरताळ

आठवडी बाजार भरला: स्थानिक अधिकारी गेले कुठे?

परतवाडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, अचलपूर तालुक्यातील आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली. तसा आदेश उपविभागीय अधिका०यांनी काढला. मात्र, गुरुवारी परतवाडा शहरातील आठवडी बाजार आणि बाजार समितीनजीक रेल्वे स्टेशन परिसरात गुरांचा बाजार भरलाच. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची अवमानना तालुकास्तरीय अधिकाºयांना दिसू नये, यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांत कोरोनोने कहर केला असताना येथील गुरुवारचा आठवडी बाजार भरणार नसल्याचे जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, अंमलबजावणीची तसदी अधिकाºयांनी घेतलीच नसल्याचे चित्र गुरुवारी शहरात दिसून आले. आठवडी बाजार सायंकाळपर्यंत गर्दीने फुलला होता.

बॉक्स

सोशल मीडियावर मेसेज टाकून झाले मोकळे?

अमरावती शहरानंतर जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका अचलपूर आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, तीन पोलीस ठाणी, जिल्हा न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय अशी प्रशासनातील महत्त्वपूर्ण कार्यालये या ठिकाणी आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तालुका आणि उपविभागीय स्तरावरील अधिकाºयांनी सोशल मीडियावर जनतेला आठवडी बाजार भरणार नाही. फिजिकल डिस्टन्स, चेहºयाला मास्क, गर्दी टाळा असे आदेश जारी केले. परंतु, प्रत्यक्षात त्याचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी ते रस्त्यावर उतरले नसल्याचे चित्र होते. त्यामुळे कोरोना थांबणार कसा, हा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.

कॅप्शन : गुरुवारचा आठवडी बाजार बंद असल्याचे जाहीर केले असताना सायंकाळी ५.३० वाजता बाजारात अशी गर्दी दिसून आली.

-----------------------

नांदगाव तालुक्यात कोरोनाचे ४२ रुग्ण

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात सध्या कोरोनाचे ४२ रुग्ण आहे. यातील २४ रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, उर्वरित अमरावती येथील सुपर हॉस्पिटलमध्ये व काही गृह विलगीकरणात आहेत.

तालुक्यात २० मे २०२० रोजी लोहगावात पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आजपावेतो ५९४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील आठ रुग्ण दगावले. त्यातील तीन रुग्ण मल्टिऑर्गन फेल्युअरने दगावले होते. उर्वरित रुग्ण उपचाराअंती दुरुस्त झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शारीरिक अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे, साबण-सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचे आरोग्य विभागाकडून जनजागरण सुरू आहे तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना तपासणी शिबिर सुरू आहे.

--------------------------------------

चांदूर रेल्वेत ‘नो मास्क - नो सर्व्हिस’

येथील सेतु केंद्रामध्ये येणाºया सर्व नागरिकांना मास्क बनधनकारक करण्यात आले आहे. ‘ नो मास्क - नो सर्विस’ असे फलक येथे लावण्यात आले आहे. सेतु केंद्राची सुविधा पाहिजे असेल, तर मास्क घालून या आणि दाखले घेऊन जा, असे निर्देश तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिले आहेत. चांदूर रेल्वे येथील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये क्वारंटाईन व उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भात तहसील, पोलीस व नगरपालिका प्रशासनाची संयुक्त बैठक गुरुवारी घेण्यात आली. त्यात शहरात चौकाचौकांत विनामास्क फिरणाºयांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार शुक्रवारपासून नगर परिषद व पोलीस विभागातर्फे मोहीम राबविण्यात येत आहे. तहसीलदार इंगळे, मुख्याधिकारी मेघना वासनकर, पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी शुक्रवारी वसतिगृहातील कोविड सेंटरची पाहणी केली.

-----------------------

संक्रमित रुग्णांकडून गृह विलगीकरणाचा फज्जा

अंजनगाव सुर्जी : शहर व तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, स्थानिक प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले आहे. मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाºयांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त वºहाडी असल्यास मंगल कार्यालयाच्या मालकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशात संक्रमित रुग्ण गृह विलगीकरणाचा फज्जा उडविताना दिसत आहेत. कोण संक्रमित आहेत, याबाबत माहिती जाहीर होत नसल्यामुळे संक्रमित रुग्ण बिनधास्त फिरताना आहेत. त्यांच्यावर कारवाई अत्यावश्यक आहे. तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, मुख्याधिकारी सुमेघ अलोणे यांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरावर तसा शिक्का मारावा, अशी नागरिकांचे अपेक्षा आहे.

-------------------------------------------------

धामणगावात २१ रुग्ण बाधित

शिक्षक, डॉक्टरांचा समावेश

धामणगाव रेल्वे : येथील तब्बल २१ जण दोन दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून, यात शिक्षक, डॉक्टरांचा समावेश आहे. शहरासह ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी घेतलेल्या या दोन्ही चाचणीत राठीनगर, पांडे ले-आऊट, तुळजाईनगर, मेन लाईन, नेहरूनगर यांसह मंगरूळ दस्तगिर, निंभोरा बोडखा येथील रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे. एकाच आठवड्यात तालुक्यात ४० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. प्रत्येक रुग्णाचे आता संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांनी दिली.

------------------------

बॉक्स

का वाढताहेत रूग्ण

१) लग्न, वरातीमधील गर्दी

२) विनामास्क सर्वत्र वावर

३) आठवडी बाजारातील गर्दी

४) लस आली म्हणून बिनधास्त

५) क्वारंटाईन होण्याची भीती नाही

६) कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही फाटा

७) फिजिकल डिस्टन्सिंग नावालाही नाही

८) बँक, कार्यालयातून सॅनिटायझर गायब

९) प्रशासनाकडूनही कारवाईत ढिलाई

१०) होमआयसोलेशनमधील रुग्णांचा मुक्त वावर

------------------

बॉक्स

अचलपूर तालुका ‘हॉट स्पॉट’

अमरावती शहराच्या तुलनेत परतवाडा शहराचा समावेश असलेला अचलपूर तालुका कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ ठरला आहे. येथील रुग्णसंख्या १५०० च्या आसपास पोहोचली आहे. त्यामागोमाग वरूडचा आकडाही हजारीत पोहोचण्याची शक्यता आहे.

Web Title: Corona's special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.