कोरोनाचा धोका वाढतोयं, शुक्रवारी पुन्हा २३३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:36+5:302021-02-06T04:22:36+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोविडचे लसीकरण वेगाने होत आहे. मात्र, नवीन वर्षात जानेवारीपासून कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने ही बाब ...

Corona's threat increases, 233 again on Friday | कोरोनाचा धोका वाढतोयं, शुक्रवारी पुन्हा २३३

कोरोनाचा धोका वाढतोयं, शुक्रवारी पुन्हा २३३

Next

अमरावती : जिल्ह्यात कोविडचे लसीकरण वेगाने होत आहे. मात्र, नवीन वर्षात जानेवारीपासून कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी धोकादायक ठरू पाहत आहे. शुक्रवारी २३३ संक्रमित रुग्ण आढळून आले असून, गत तीन दिवसांत एकूण पॉझिटिव्हीची संख्या ५७० झाली आहे.

नागरिकांची समूह प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने अमरावती जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालयाची प्रयोगशाोत रॅपिड ॲन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार शुक्रवारी २३३ नवे कोरोना रूग्ण आढळलयाची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली. शहरी भागातच संक्रमित रूग्णांची वेगाने वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, नांदगाव व अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, दयासागर दवाखान्यात संक्रमितांवर उपचारासाठी सुविधा आहे. होम आयासोलेशनमुळे हेल्थ केअर केंद्र बंद करण्यात आले आहे.

००००००००००००

आरोग्य यंत्रणेने ६०० कर्मचारी पाठविले घरी

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोनाची घसरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातून ६०० कंत्राटी कर्मचारी कमी केले. आता केवळ २०० कंत्राटी कार्यरत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली. तसेच ग्रामीण भागातील १४ व अमरावती येथील २ हेल्थ केअर सेंटर बंद करण्यात आले आहे.

मणुष्यबळ

०००००००००००००००

अमरावतीत रूग्णवाढ वेगाने

कोविडचा आलेख घसरत असला तरी अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ वेगाने होत आहे. त्याखालोखाल यवतमाळ, अकोला, भंडारा, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, गडचिरोली व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे आरोग्य यंत्रणेची आकडेवारी आहे.

०००००००००००००००००

कोट

कोरोना चाचणीची समस्या नाही. संक्रमितांची संख्या वाढती असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे हाच उपाय आहे. मास्कचा वापर, शारीरिक अंतर ठेवणे आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे. सर्दी, खोकला, ताप असल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी. तूर्त कोरोनाची दुसरी लाट म्हणता येणार नाही.

-शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती

Web Title: Corona's threat increases, 233 again on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.