कोरोनाचा धोका वाढतोय, वीज ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची ऑनलाईन सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:12 AM2021-04-25T04:12:35+5:302021-04-25T04:12:35+5:30

अमरावती : सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ...

Corona's threat is on the rise, an online facility for electricity consumers to pay their electricity bills | कोरोनाचा धोका वाढतोय, वीज ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची ऑनलाईन सोय

कोरोनाचा धोका वाढतोय, वीज ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची ऑनलाईन सोय

Next

अमरावती : सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे. वीज ग्राहकांनी धोका पत्कारण्याऐवजी वीजबिल भरण्याच्या रांगेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या 'ऑनलाईन' सोयीद्वारे घरबसल्या वीजबिलांचा भरणा करावा, अशी माहिती मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी दिली.

महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल ॲप तसेच अन्य पर्यायांद्वारे 'ऑनलाईन' वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहून धोका पत्कारण्यापेक्षा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत 'ऑनलाईन' वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे. महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ तसेच जून २०१६ पासून मोबाईल ॲपव्दारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात तासंनतास रांगेत उभे राहण्याऐवजी 'ऑनलाईन' वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती द्यावी.

बॉक्स:

लघुदाब ग्राहकांसाठी सुट

लघुदाब वीजग्राहकांसाठी 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतू क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन'द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.

बॉक्स:

एसएमएसव्दारे पोच देण्याची सुविधा

'ऑनलाईन'द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’ द्वारे पोच देण्यात येत आहे. याशिवाय महावितरणच्या संकेतस्थळावर व मोबाईल ॲपव्दारे मागील वर्षभराच्या महिन्यांतील बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

Web Title: Corona's threat is on the rise, an online facility for electricity consumers to pay their electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.