Coronavirus in Amravati ; अमरावती जिल्ह्यातील ९५ टक्के लसीकरण केंद्रांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 09:45 AM2021-04-30T09:45:43+5:302021-04-30T09:47:27+5:30

Amravati news कोरोना प्रतिबंधक प्रभावी उपाययोजना या अर्थाने जिल्ह्यातील ११३ केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे गुरुवारी १०५ केंद्रांना टाळे लागले. केंद्रावरून आल्यापावली परत जावे लागत असल्याने ज्येष्ठांची फरपट होत आहे.

Coronavirus in Amravati; Avoid 95% vaccination centers in Amravati district | Coronavirus in Amravati ; अमरावती जिल्ह्यातील ९५ टक्के लसीकरण केंद्रांना टाळे

Coronavirus in Amravati ; अमरावती जिल्ह्यातील ९५ टक्के लसीकरण केंद्रांना टाळे

Next
ठळक मुद्देनागरिकांची पायपीटआतापर्यंत २,८६,६७९ जणांना मिळाली लस

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : कोरोना प्रतिबंधक प्रभावी उपाययोजना या अर्थाने जिल्ह्यातील ११३ केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे गुरुवारी १०५ केंद्रांना टाळे लागले. केंद्रावरून आल्यापावली परत जावे लागत असल्याने ज्येष्ठांची फरपट होत आहे. लस साठ्याची एकूण स्थिती पाहता १ मे पासून सुरू करण्यात येणारे १८ वर्षांवरील युवकांचे लसीकरणावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून चार टप्प्यांत लसीकरण करण्यात येत आहे. मार्च महिन्यापर्यंत सुरळीत सुरू असलेल्या लसीकरणाला मात्र, नंतर पुरवठ्याचे ग्रहण लागले आहे. साडेचार लाख डोजची मागणी असताना मागील आठवड्यात पहिले २५ हजार व दोन दिवसांनंतर १५ हजार डोज जिल्ह्याला प्राप्त झाले. मात्र, जिल्ह्यात रोज नऊ हजारांपर्यंत लसीकरण होत असल्याने बुधवार रात्रीपासून लसीचा ठणटणात सुरू झाली. केंद्राला कुलूप लागल्याने पुरवठा आला असेल या आशेवर ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्या माहितीनुसार गुरुवारी पहिला व दुसरा अशा दोन्ही प्रकारात ५,४४४ जणांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी ५३९ व्हायल लागले आहे. आता या केंद्रावरीलही साठा संपुष्टात आल्याने लसीकरणासाठी लाभार्थ्यांची बोंबाबोंब सुरू आहे.

२,८७,९०० डोज प्राप्त, २,८६,६७९ लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचे २,३२,९८० व कोव्हॅक्सिनचे ५४,९२० डोज प्राप्त झालेत. त्यातुलनेत २,८६,६७९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यात २,३५,६१२ नागरिकांनी पहिला व ५१,०६७ जणांनी दुसरा डोज घेतलेला आहे. अद्याप १,८४,५४५ नागरिकांनी दुसरा डोज घेणे बाकी आहे. यापैकी एक लाखांवर नागरिकांचा दुसरा डोज घेण्याचा कालावधी संपुष्टात येत असताना लसींचा पुरवठाच झालेला नाही.

लसींचा साठा संपल्याने केवळ आठ- दहाच केंद्र सुरू आहे. मागणी नोंदविण्यात आली आहे. १ मे पासून सुरू होणारे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणाविषयी सध्या सांगता येणार नाही. सध्या कोविड ॲपवर नोंदणी सुरू आहे.

- शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी.

Web Title: Coronavirus in Amravati; Avoid 95% vaccination centers in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.