CoronaVirus In Amravati: अमरावती विभागातील ५ शहरांत आठवडाभर लॉकडाऊन; यशोमती ठाकूरांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 01:38 AM2021-02-22T01:38:03+5:302021-02-22T07:01:12+5:30
अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर व अकोल्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी ही घोषणा केली.
अमरावती : विभागात कोरोना नियंत्रणासाठी आता अमरावती, अकोला महापालिका आणि अचलपूर, अकोट व मूर्तिजापूर नगरपरिषद हद्दीत सोमवारी रात्री ८ वाजेपासून पुन्हा सात दिवस ‘लॉकडाऊन’चा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार बंद असतील.
अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर व अकोल्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी ही घोषणा केली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांसाठी लाॅकडाऊनचे वेगळे आदेश काढले आहेत. ग्राहकांनी जवळची बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडूनच खरेदी करावी. उपहारगृहे, हॉटेलने पार्सल सुविधेसाठी परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता वधू व वरपक्षासह २५ व्यक्तींना परवानगी राहील. मालवाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध राहणार नाहीत. भाजी मंडई पहाटे ३ ते ६ सुरू राहील.