coronavirus: अभियांत्रिकीच्या परीक्षा लांबणीवरच, विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 07:11 PM2020-06-11T19:11:58+5:302020-06-11T19:12:38+5:30
: शासकीय अभियांत्रिकीमध्येही ‘वेट अॅन्ड वॉच’ अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांसह अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी ...
: शासकीय अभियांत्रिकीमध्येही ‘वेट अॅन्ड वॉच’
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांसह अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा लांबणार आहे. शासनाकडून अद्यापही परीक्षासंदर्भात निर्णय झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पुढील सत्रातील प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसह पालकही संभ्रमात आहेत.
विद्यापीठाशी संलग्न पाचही जिल्ह्यांमध्ये २३ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. दरवर्षी एप्रिलपासून उन्हाळी या महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेण्यात येतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे या परीक्षांना फटका बसला आहे. विद्यापीठाने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन चालविले आहे. एकूण १४ शाखांच्या आठ सेमिस्टरची परीक्षा ४८ हजारांवर विद्यार्थी देतील. रोल नंबर, कंट्रोल शीट आदी कामे आटोपली आहेत. अभियांत्रिकीच्या कोणत्या शाखेच्या परीक्षा कोणत्या महाविद्यालयात घ्याव्यात, हेदेखील निश्चित झाले. मात्र, परीक्षेविषयी शासनादेश नाही. त्यामुळे शासकीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी देखील परीक्षेविषयी ‘वेट अॅन्ड वॉच’ मध्ये आहे. परीक्षेचा गुंता सुटत असल्याने अभियांत्रिकीची पदवी घेऊन करियर करण्याचे स्वप्न बघणाºया विद्यार्थ्यांना प्रचंड चिंता सतावू लागली आहे.
नियमित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश
अभियांत्रिकीच्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची तयारी अमरावती विद्यापीठाने सुरू केल्याची माहिती सहायक कुलसचिव राहूल नरवाडे यांनी दिली. यात अंतिम वर्षात प्रवेशित आणि बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.
शासनादेशानंतरच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा गुंता सुटेल. परंतु, हल्ली परिस्थिती बघता आॅगस्ट महिन्यात परीक्षा होण्याचे संकेत आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ