coronavirus : कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून मेडिसीनला प्राधान्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 08:08 PM2020-04-23T20:08:35+5:302020-04-23T20:15:10+5:30

अमरावती -  मध्य रेल्वे विभागाकडून ‘लॉकडाऊन’च्या काळात जीवनावश्यक वस्तू, शेतीमाल, औषधी व अन्य विविध उत्पादनांची ने-आण करण्यासाठी ८ एप्रिल ते ...

coronavirus: Medicine preferred from Covid-19 parcel cargo train | coronavirus : कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून मेडिसीनला प्राधान्य 

coronavirus : कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून मेडिसीनला प्राधान्य 

Next
ठळक मुद्देकोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून मेडिसीनला प्राधान्य अहमदाबाद, राजकोट येथून आले कार्टूनजीवनावश्यक वस्तूंची ने-आण नाहीच 

अमरावती -  मध्य रेल्वे विभागाकडून ‘लॉकडाऊन’च्या काळात जीवनावश्यक वस्तू, शेतीमाल, औषधी व अन्य विविध उत्पादनांची ने-आण करण्यासाठी ८ एप्रिल ते ३ मे दरम्यान कोविड-१९ पार्सल कार्गो रेल्वे ट्रेनची सुविधा केली आहे. आतापर्यंत या पार्सल रेल्वेमध्ये अमरावतीकरांनी केवळ औषधी मागविल्या आहेत, हे विशेष. बडनेरा रेल्वे स्थानकावर गुरुवारी अहमदाबाद येथून विविध औषधांचे सात कार्टून आल्याची माहिती आहे. 

रेल्वे बोर्डाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवासी गाड्या बंद केल्यात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात जीवनावशयक वस्तूंची ने-आण सुरू ठेवली आहे. त्याकरिता प्रारंभी मालगाड्या सुरू ठेवल्या, तर आता व्यावसायिक, उद्योजक, शेतक-यांच्या सोयीसाठी कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेन आरंभली आहे. मध्य रेल्वे भुसावळ विभागातून पोरबंदर, मुंबई, शालीमार, नागपूर यादरम्यान पार्सल पाठविले जात आहेत. मुंबई- नागपूर, शालीमार ते मुंबई, पोरबंदर ते शालीमार या दरम्यान कोविड -१९ पार्सल कार्गो रेल्वे ट्रेन ३ मेपर्यंत धावणार आहे. परंतु, अमरावती जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजक, कंत्राटदार, पुरवठादार आदींनी या ट्रेनचा लाभ घेतलेला नाही, अशी रेल्वे सूत्रांची माहिती आहे. आतापर्यंत कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून औषधी मागविल्या गेल्या आहेत. 

अहमदाबाद, राजकोट, रायपूर येथून विविध कंपन्यांचे औषध अमरावतीच्या दवा बाजारात आले. मुंबई, कल्याण, इगतपुरी, नाशिक, जळगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर येथे कोविड -१९ पार्सल कार्गो रेल्वे ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर आतापर्यंत ४७५ मेडिसीन कार्टून उतरविण्यात आल्याची माहिती एका रेल्वे अधिकाºयांनी दिली.

Web Title: coronavirus: Medicine preferred from Covid-19 parcel cargo train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.