टेंभूरखेडा ग्रामपंचायतीकडून कोरोनायोद्ध्याचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:08+5:302021-09-02T04:26:08+5:30
टेंभूरखेडा : ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने कोरोनायोद्धा ठरलेले डॉ. अमोल कोहळे यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी सतीश देशमुख यांच्या हस्ते ...
टेंभूरखेडा : ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने कोरोनायोद्धा ठरलेले डॉ. अमोल कोहळे यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी सतीश देशमुख यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह व गौरव प्रमाणपत्र देण्यात आले. सरपंच रोशनी निंभोरकर, उपसरपंच राजेंद्र सोनुले, ग्रामपंचायत सदस्य सचिन वानखडे, मनोज माहुलकर, अशोक पंडागळे, विलास ढोमणे, गोपाल वाघमारे, सीमा देशमुख, लता वानखडे, संगीता घोडकी, प्रज्ञा लांडगे, अरुणा सालोडे, लीला युवनाले तसेच पंचायत समिती सदस्य ललिता लांडगे, पोलीस पाटील साधना नवले यांच्यासह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनिस तसेच आशा वर्कर उपस्थित होत्या.
--------------------------------
सागरवाडी शिवारात शेतकऱ्याला मारहाण, परस्परविरोधी तक्रारी
येवदा : नजीकच्या पिंपळगाव येथील सागरवाडी शिवारात शेताच्या धुऱ्यावर उभा असलेल्या वैभव हरिभाऊ गवारे (२७) या शेतकºयाला सर्जेराजे गणेशराव नवलकर व रोहित उद्धव नवलकार या चुलत्या-पुतण्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. रस्ता असताना पºहाटीतून दुचाकी का आणली, असे म्हणत त्यांनी हे कृत्य केले. याप्रकरणी येवदा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. याच प्रकरणात उद्धवराव गोपाळराव नवलकार (५१) यांनी वैभव हरिभाऊ गवारे व हरिभाऊ गवारे या पिता-पुत्राविरुद्ध तक्रार दाखल केली. सर्जेराजे नवलकारांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता वैभव व हरिभाऊ यांनी कुऱ्हाडीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------------