कोरोनात ‘लिची’ची आंबट-गोड चव हरपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:04+5:302021-05-14T04:13:04+5:30

लॉकडाऊनचा फटका, ग्राहक मिळेना, थोक फळ विक्रेते हैराण अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात फळ बाजाराचे आर्कषण ठरणाऱ्या बिहारच्या दुआबात परिसरात ...

The coronet loses its sour-sweet taste | कोरोनात ‘लिची’ची आंबट-गोड चव हरपली

कोरोनात ‘लिची’ची आंबट-गोड चव हरपली

Next

लॉकडाऊनचा फटका, ग्राहक मिळेना, थोक फळ विक्रेते हैराण

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात फळ बाजाराचे आर्कषण ठरणाऱ्या बिहारच्या दुआबात परिसरात उत्पादित होणाऱ्या लिचीला यंदा ग्राहक मिळत नसल्याचे वास्तव आहे. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी लिची उपयुक्त ठरत असली तरी हल्ली लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. परिणामी विक्रीसाठी आणल्या गेलेल्या लिचीला ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

उन्हाळ्यात फळबाजारात आंबा विक्रीचा माेसम असतो. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी नागरिक विविध प्रकारची फळे खाणे अथवा ज्युस घेण्यास पसंती दर्शवितात. अशातच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ३० मेपर्यंत कठोर संचारबंदी लागू केली आहे. अशातच मुस्लिम बांधवांचा रमजान महिना संपला असून, शुक्रवारी ईद साजरी केली जाणार आहे. मात्र, रमजान महिना कॅश करण्यासाठी फळविक्रेत्यांनी बिहार येथील लिची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणली. तथापि, गल्लीबोळात

अथवा रस्त्यालगत लागणाऱ्या फळविक्रीच्या हातगाड्या बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांपर्यंत फळे पोहोचत नाहीत. त्यामुळेच अनेकांच्या पसंतीला असलेल्या लिचीची आंबट - गोड चव घेता येत नाही. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, ईतवारा बाजार, मध्यवर्ती बस स्थानक परिसरासह ग्रामीण भागातही थोक फळ विक्रेत्यांना घाऊक विक्रेत्यांपर्यंत लिची पोहोचविता येत नाही. थोकमध्ये लिची प्रतिकिलो २०० रुपये दराने विकली जात आहे, तर घाऊकमध्ये २५० दर असल्याची माहिती आहे.

---------------------

बिहारच्या दुआबात, मुज्जफरपूर येथे उत्पादित होऊन ती देशभरात उन्हाळ्यातच विक्रीसाठी पाठविली जाते. विशेषत: एप्रिल, मे महिन्यात विक्रीसाठी आणली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे लिची ग्राहकांपर्यंत पाेहोचली नाही. लिची नाशिवंत असल्याने खराब झाल्याने फेकण्यात आली. थोक फळ विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे.

-राजा मोटवानी, थोक फळ विक्रेता, अमरावती.

----------------

रमजान महिन्यात उपवासात लिची वापरली जाते. मात्र, यंदा रमजान महिन्यात फळ विक्रीची दुकाने बंद होती. त्यामुळे जी फळे उपलब्ध झाली ते खावी लागली. लिची वेळेवर मिळाली नाही. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी लिची हे फार उपयुक्त ठरते.

- अब्दुल रफिक, ग्राहक, अमरावती.

Web Title: The coronet loses its sour-sweet taste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.