मालवाहतुकीमुळे महामंडळ मालामाल, चालकांचे मात्र बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:11 AM2021-05-30T04:11:49+5:302021-05-30T04:11:49+5:30

अमरावती/ संदीप मानकर कोरोनाकाळात एसटी महामंडळाला मालामाल करणाऱ्या मालवाहतुकीने चालकांच्या खिशाला कात्री लावली आहे. चालकांना केव्हाही कर्तव्यावर जावे लागते. ...

Corporation freight due to freight, but drivers are unwell | मालवाहतुकीमुळे महामंडळ मालामाल, चालकांचे मात्र बेहाल

मालवाहतुकीमुळे महामंडळ मालामाल, चालकांचे मात्र बेहाल

Next

अमरावती/ संदीप मानकर

कोरोनाकाळात एसटी महामंडळाला मालामाल करणाऱ्या मालवाहतुकीने चालकांच्या खिशाला कात्री लावली आहे. चालकांना केव्हाही कर्तव्यावर जावे लागते. त्यांना वाढीव महागाई भत्ता मिळत नाही. त्यांना जो काही पगार मिळतो, त्यावरच त्यांची भिस्त आहे.

कोरोनाकाळात २७ मेपर्यंत एसटी ट्रकच्या मालवाहतुकीसाठी २३९५ फेऱ्या झाल्या. त्याकरिता ३ लाख ४८ हजार ४६९ किमी प्रवास झाला. त्यातून एसटीला १ कोटी ३३ लाख ९१ हजार ३३१ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. याकरिता एक मालवाहतूक कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचे महाकार्गो नावाने ब्रँडिंग केले जात आहे. एसटी मालवाहतुकीत विटा, तेल, सिमेंट, खत, शेतमाल, धान्य तसेच बांधकाम साहित्य याची अहोरात्र वाहतूक केली जात असल्याचे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले. मालवाहतुकीकरिता ०१ ते १०० किमीकरिता ४२ रुपये, १०१ ते २५० किमीकरिता ४४ रुपये, तर २५१ किमीनंतर ४२ रुपये प्रतिकिलोमीटरचे दर आकारण्यात येत आहे.

वाहतूक सुरू असलेले ट्रक - २५

जिल्ह्यातील एकूण एसटी ट्रक - २५

बॉक्स:

लाॅकडाऊनमध्ये १२ लाखांची कमाई

१) लॉकडऊनमध्ये गत महिनाभरात मालवाहतूक सेवेतून एसटीला १२ ते १३ लाखांचे उत्पन्न मिळाले

२) दरमहा सरासरी एसटीला १२ ते १३ लाखांचे नियमित उत्पन्न मिळत आहे.

३) एसटीची मालवाहतूक सुरक्षित मानली जात आहे. कमी दरात शेतकरी, व्यावसायिक तसेच उद्योगांना एसटीची सेवा मिळत आहे. सध्या एसटीची चाके जरी थांबली असली तर मालवाहतूक सेवा अहोरात्र सुरू आहे.

बॉक्स:

परतीचे भाडे मिळेपर्यंत बस स्थानकातच मुक्काम

चालकाला ज्या ठिकाणी मालवाहतुकीचे भाडे घेऊन पाठविले जाते, तेथे माल उतरविल्यानंतर एसटी तेथील बसस्थानकात लावली जाते. मात्र, तेथून भाडे मिळेपर्यंत तेथील बस स्थानकाच्या किंवा आगाराच्या विश्रामगृह रूममध्ये चालकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली.

कोट

चालक म्हणतात......

कोविडच्या गाईड लाईननुसार प्रत्येक चालकाला आठवड्यातून दोन दिवस एसटी ट्रकवर जाण्याची ड्युटी मिळते. ट्रक खाली केल्यानंतर जवळच्या बसस्थानकात किंवा आगारात आम्हाला रिपोर्टिंग करावी लागते.

- निकेश शेलोकार, चालक, अमरावती

कोट

कोरोनाकाळातही महामंडळाच्यावतीने आम्हाला व्यवस्थित पगार मिळत आहे. दोन दिवस कर्तव्यावर जावे लागते. ज्या ठिकाणी ट्रक उभा केला, तेथील बस स्थानकात राहण्याची व्यवस्था आहे. रात्रीचा ७० ते ७५ रूपये वाढीव भत्ता देण्यात येतो.

- अरविंद कुळसंगे, चालक, अमरावती

बॉक्स :

चालकाचा होतो वैयक्तिक खर्च

फेरीकरिता ॲडव्हान्स दिला जात नाही. चालकाचा पगार हा ७ तारखेला होतो. मालवाहतूक केल्यानंतर एसटी ट्रक खाली करण्यात येतो. दुसरी ऑर्डर मिळेपर्यंत चालकाला त्याच ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक खर्च होत असल्याची बाब पुढे आली आहे.

कोट

मालवाहतुकीमध्ये एसटी चालक ज्या ठिकाणी जातात, तेथे ४८ तास थांबावे लागते. तेथूनच जर त्यांना नागपूर किवा इतर ठिकाणी भाडे मिळाले, तर तेथून परतण्यासाठी एसटी बस किंवा इतर वाहन मिळत नाही. काही जणांना तर स्वत:चे पैसे खर्च करून परत येण्याचे वेळ आली. एसटी चालकाला किमान ३०० रुपये भत्ता मिळावा, अशी आमची मागणी आहे.

- मोहित देशमुख, सचिव, एसटी कामगार संघटना, अमरावती

Web Title: Corporation freight due to freight, but drivers are unwell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.