अतिक्रमणाविरोधात नगरसेविकेचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:22 AM2020-12-03T04:22:47+5:302020-12-03T04:22:47+5:30
बाहेरच्या पानासाठी सेंटर मस्ट फोटो पी०१ चांदूरबाजार चांदूर बाजार : शहरातील स्टेट बँकेसमोरील ८४ अतिक्रमित दुकानांवर कारवाई करण्यात यावी, ...
बाहेरच्या पानासाठी सेंटर मस्ट
फोटो पी०१ चांदूरबाजार
चांदूर बाजार : शहरातील स्टेट बँकेसमोरील ८४ अतिक्रमित दुकानांवर कारवाई करण्यात यावी, त्यांच्याकडून थकीत कर वसूल करण्यात यावा, यासाठी नगरसेविका लविना अकोलकर यांनी मंगळवारपासून पालिकेसमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.
शहरातील वाढते अतिक्रमण पाहता, पालिकेने धडक कार्यवाही करीत मुख्य बाजारपेठमधील अतिक्रमण जमीनदोस्त केले. त्यात नियमित कर भरणाऱ्या घुमटीधारक दुकानदारांची दुकानेही पाडण्यात आली. मात्र, स्टेट बँकेसमोरील ८४ दुकानांना अभय देण्यात आले. हा दुजाभाव का, असा सवाल करून पालिकेने कारवाई करावी, अन्यथा आपण आत्महदहन करू, असा गंभीर इशारा अकोलकर यांनी दिला आहे. नगरसेविका आशा माकोडे, चंदा खंडारे, फातिमा बानो, आबीद हुसेन, सचिन खुळे यांनी ठिय्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले. आंदोलनात अतिक्रमण निर्मूलन कारवाईला बळी पडलेले घुमटीधारक दुकानदारसुद्धा सहभागी झाले होते.
---------------