आईच्या तेरवीचा खर्च शाळेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:12+5:302021-06-11T04:10:12+5:30
शिक्षक सोनवाल यांचा आदर्श; वडीलही आजारी चांदूर रेल्वे : वडिलांपाठोपाठ आईलाही कोरोना झाला. त्यातच आईचे मे महिन्यात निधन झाले. ...
शिक्षक सोनवाल यांचा आदर्श; वडीलही आजारी
चांदूर रेल्वे : वडिलांपाठोपाठ आईलाही कोरोना झाला. त्यातच आईचे मे महिन्यात निधन झाले. आई गेल्याचे दुःख असताना वडिलांना कोरोनानंतरच्या म्युकोरमायकोसिस आजाराने ग्रासले. एकंदरीत दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही तालुक्यातील दानापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय सोनवाल यांनी सामाजिक भान ठेवत आईच्या तेरवीचा खर्च जिल्हा परिषद शाळेला दिला.
एखाद्याला मदत करायची असल्यास कारण लागत नाही आणि मदत न करणाऱ्याला अनेक कारणे असतात. असाच प्रत्यय सोनवाल यांच्या कार्यातून दिसून येत आहे. त्यांची आई प्रमिला रामदास सोनवाल यांचे कोरोनाने २० मे रोजी निधन झाले. त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम घरघुती पध्दतीने करून उर्वरित रक्कम १० हजार रुपये त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दानापूरला दान दिले.
त्यात शाळेला कंपाऊंड, विजेचे बिल भरणा आणि इतर विद्यार्थीपयोगी कामे ते करणार असल्याचे सांगितले. संजय सोनवल हे तालुक्यात एक कर्तव्यनिष्ठ आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहे. घरी दुःखाच्या प्रसंगातही त्यांनी त्यांच्यातील सामाजिक भावना जिवंत ठेवल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.