म्युकरमायकोसिसवरील खर्च आठ लाख, मदत मात्र, तोकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:39+5:302021-05-28T04:10:39+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख माघारत असतांना रुग्णांवर नव्याने संकट ओढावले आहे. या आजाराचा खर्च आठ ते ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख माघारत असतांना रुग्णांवर नव्याने संकट ओढावले आहे. या आजाराचा खर्च आठ ते १० लाखांवर जात असताना शासनाने या आजाराला महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केले आहे. यात अल्पशी मदत मिळणार असल्याने उपचार कसा कसा होणार, हा प्रश्न रुग्णांचे नातेवाईकांसमोर उभा ठाकला आहे.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे संकट वाढते आहे. सद्यस्थितीत १५५ रुग्णांची नोंद शासकीय व खासगी रुग्णालयांत झालेली आहे. सद्यस्थितीत ५२ रुग्नांवर उपचार सुरू आहे. या आजाराने दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. याशिवाय नाक, कान, घसा व नेत्र तज्ञांकडे रोज किंवा एक दिवसाआड एक रुग्ण तपासणीला येत असल्याचे या तज्ज्ञांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारावरील पाच यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. याशिवाय रुग्णालयात किती शस्त्रक्रिया पार पडल्या याची माहिती अद्याप आरोग्य विभागाकडे नाही.
खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च जनआरोग्य योजनेच्या लाभार्थीवर पडू नये, याकरिता योजनेत समाविष्ट खासगी रुग्णालयांना माहात्मा फुले योजनेतून १० दिवसांचे पॅकेज दिले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
योजनेमध्ये आजारासाठी १९ पॅकेज
योजनेमध्ये १९ प्रकाराचे पॅकेज आहे. म्यकरमायकोसिससाठी ३० हजारांपासून सव्वा लाखांपर्यंतची मदत मिळू शकते. दीड लाखांपर्यंतचेही पॅकेज आहे. याशिवाय मेडिकल व इ्रन्शुरन्स पॅकेज आहे. आयुष्यमान बारत योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंतचा इलाज केला जाऊ शकतो. याशिवाय सुपरस्पेसािलटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमएमसी व बेस्ट रुग्णालयाचा योजनेत समावेश आहे. शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल असल्यास त्याला या आजारावरील महागडी औषधी मोफत मिळत असल्याचे या योजनेचे समन्वयक डॉ. सानप यांनी सांगितले.
बॉक्स
आजारावर औषध, इंजेक्शनचा महागडा खर्च
म्यकरमायकोसिसच्या रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारच्या सहा ते आठ तज्ज्ञांची आवश्यकता असते. याशिवाय ‘लिपोसोमल ॲम्फोटेसिसिन’चे रोज तीन ते पाच पाच इंजेक्शन द्यावे लागतात. ही इंजेक्शन खूप महागडी आहे व साधारणपणे सात ते १४ दिवस हे इंजेक्शन घ्यावे लागतात. याशिवाय पोासॉकोनाझोल या गोळ्यांसह अन्य औषधी उपचारासाठी लागतात. या आजारासंदर्भात १८ मे रोजी शासनादेश जारी झाला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यात चार दिवस गेले असल्याची माहिती या योजनेच्या समन्वयकांनी दिली.
कोट
रुग्णांचे नातेवाईक आर्थिक अडचणीत
या आजारावरील औषध व इंजेक्शनचा तुटवडा आहे. जिल्हा प्रशासनाने समिती नेमून खासगी रुग्णालयांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून पुरवठा केला जातो. मात्र, पुरेसे इंजेक्शन याद्वारे मिळत नाही. एका रुग्णाचे नातेवाईक
कोट
म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन खूप महागडी आहेत. अद्याप योजनेचे पॅकेज मिळालेले नाही. एका दिवसाची औषधी आणली तर दुसऱ्या दिवसाचे काय हा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे अडचणीत आलो आहे.
एका रुग्णाचे नातेवाईक
पाईंटर
जिल्ह्यात एकूण रुग्ण : १५५
सध्या उपचार सुरू : ५२
आतापर्यंत मृत्यू : ०२