कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी ३० लाख रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:10+5:302021-06-09T04:15:10+5:30
अमरावती : कोरोनाने दगावलेल्या बेवारस, निराधारांच्या मृतदेहांवर महापालिकाद्वारे मोफत अंत्यसंस्कार केले जातात. यानंतर राख भरणे, अस्थी गोळा करणे, विसर्जन, ...
अमरावती : कोरोनाने दगावलेल्या बेवारस, निराधारांच्या मृतदेहांवर महापालिकाद्वारे मोफत अंत्यसंस्कार केले जातात. यानंतर राख भरणे, अस्थी गोळा करणे, विसर्जन, अंत्यसंस्काराच्या स्टँडचे निर्जंतुकीकरण, राखेवर हायपोक्लोराईड फवारणी आदी सर्व कामे महापालिका अथवा हिंदू स्मशानभूमीचे कर्मचारी निरपेक्ष भावनेने करीत आहेत. आतापर्यंत अशा कामांसाठी ३० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. ५५७ मृतदेहांचा अंत्यविधी करण्यात आला.
कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. एखादी व्यक्ती पुढे आल्यास तिला पीपीई किट घालूनच अंत्यसंस्काराची परवानगी दिली जाते. येथील हिंदू स्मशानभूमी, विलासनगर, शंकरनगर, एसआरपीएफ येथील अंत्यसंस्कार करण्यात येतात. याठिकाणी लाकडावर दहनासाठी १२ स्टॅण्ड असून, दोन गॅस दाहिनी व एक विद्युत दाहिनी आहे. स्मशानभूमीचे निर्जंतुकीकरण केले जाते. मृतांची संख्या दिवसागणिक वाढत असून, दरदिवशी १० ते १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याची माहिती महापालिका स्वच्छता विभागप्रमुख डॉ. सीमा नेताम यांनी दिली. या मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी दोन स्वतंत्र वाहने आणि चालक नेमण्यात आले आहेत.
-------
अंत्यसंस्कारासाठी पाच हजार रुपये खर्च
एका कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी २७०० रुपये खर्च लागतो. लाकूड जाळण्यासाठी रॉकेल, डिझेल लागते. मात्र, अलीकडे ओली लाकडे भिजलेली असल्याने ती जळण्यास विलंब लागतो. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना कर्मचारी, नातेवाइकांना पीपीई किट परिधान करावेच लागते. अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीचे निर्जंतुकीकरण करावे लागते. त्याचा एकंदर पाच हजार रुपये खर्च होतो. यात राळ, लाकूड, डिझेल पेट्रोल, पीपीई किटचा समावेश आहे.
-------------------
कर्मचाऱ्यांची जबाबदारी
१) कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृतांची संख्या कायम आहे. दरदिवशी १० ते १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात.
२) अंत्यसंस्कराची तयारी, त्यानंतर राख भरणे, अस्थी गोळा करणे, दहनस्थळाचे निर्जंतुकीकरण करावे लागते.
३) राखेवर हायपोक्लोराईडची फवारणी करावी लागते. अस्थी विसर्जनाचे कामही करावे लागते.
४) कोरोना मृतदेहांची संख्या वाढत असल्याने महापालिका, हिंदू स्मशानभूमीतील कर्मचारी दोन पाळीत कर्तव्य बजावत आहेत.
------------
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित:
बरे झालेले रुग्ण:
सध्या उपचार घेत असलेले :
एकूण मृत्यू:
सध्याचा पॉझिटिव्ह रेट:
--------------------
हिंदू स्मशानभूमीसह विलासनगर, शंकरनगर, एसआरपीएफ येथील स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. बेवारस अथवा नातेवाईक आले नाहीत, अशा मृतदेहांवरही महापालिका अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेते.
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका.
-----------
कोट
गॅस दाहिनी सुरू असल्यास मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन होते, अन्यथा सरणावर अंत्यसंस्कार करताना ताण येताे. मध्यंतरी गॅस दाहिनी काही कारणास्तव बंद होती. कर्मचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
- एकनाथ इंगळे, प्रबंधक, हिंदू स्मशानभूमी, अमरावती.