कापूस @ ४५०० रुपये

By admin | Published: April 19, 2015 12:07 AM2015-04-19T00:07:31+5:302015-04-19T00:07:31+5:30

शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची विक्री झाल्यानंतर कापसाच्या भावात गेल्या आठवड्यात ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल भाववाढ झाली.

Cotton @ 4500 rupees | कापूस @ ४५०० रुपये

कापूस @ ४५०० रुपये

Next

हंगाम सरला : शेतकऱ्यांचा माल नाही, व्यापाऱ्यांचाच फायदा
अमरावती : शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची विक्री झाल्यानंतर कापसाच्या भावात गेल्या आठवड्यात ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल भाववाढ झाली. हंगाम संपताना शेतकऱ्याजवळ कापूस नाही. त्यामुळे सद्यस्थितीत विकला जाणारा माल व्यापाऱ्यांचा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सरकी व रूई यांचे भाव वधारल्याचे दर्शवून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे.
जिल्ह्यात पणन महासंघ व सीसीआयद्वारा कापसाची खरेदी करण्यात आली. या दोन्ही विभागांद्वारा कापसाचा हमीभाव ४०५० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात आली.
ही केंद्रे जिल्ह्यात अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांनी ३२०० ते ३७०० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकला. आधीच कर्जबाजारी व अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच व्यापाऱ्यांना कापूस विकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपला आहे. कापसाची शासकीय खरेदी बंद झाली आहे व कापसाचा हंगाम संपला आहे. त्यामुळे या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे.
अशी होत आहे भाववाढ
चालू महिन्यात १ एप्रिलपासून सोयाबीनसह तूर व हरभऱ्याच्या भावात वाढ होत आहे. ३१ मार्चला सोयाबीनचे भाव ३१०० रूपये प्रति क्विंटल होते. १५ एप्रिलला ३४५० रूपये प्रति क्विंटल आहेत. तुरीचे भाव ५०० रूपयांनी वाढून ६५०० रूपये प्रति क्विंटल झाले आहेत. हरभरा ३२०० रूपयांवरून ३८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे.

अशी होत आहे भाववाढ
चालू महिन्यात १ एप्रिलपासून सोयाबीनसह तूर व हरभऱ्याच्या भावात वाढ होत आहे. ३१ मार्चला सोयाबीनचे भाव ३१०० रूपये प्रति क्विंटल होते. १५ एप्रिलला ३४५० रूपये प्रति क्विंटल आहेत. तुरीचे भाव ५०० रूपयांनी वाढून ६५०० रूपये प्रति क्विंटल झाले आहेत. हरभरा ३२०० रूपयांवरून ३८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे.

Web Title: Cotton @ 4500 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.