कापूस उत्पादकांना ४५० कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:28 PM2017-12-20T23:28:05+5:302017-12-20T23:30:07+5:30

यंत्र सर्वच बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

Cotton growers crush 450 crores | कापूस उत्पादकांना ४५० कोटींचा फटका!

कापूस उत्पादकांना ४५० कोटींचा फटका!

Next
ठळक मुद्देगुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव : १८ हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र प्रभावित

आॅनलाईन लोकमत
चांदूरबाजार : यंत्र सर्वच बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील १८ हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक ८० ते ९० टक्के बुडाले आहे. परिणामी तालुक्यातील कापूस उत्पादकांना ४५० कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
चार ते पाच वर्षांपासून तालुक्यात सोयाबीन पीक शेतकऱ्यांना धोका देत असल्यामुळे तसेच मागील वर्षी कापसाला चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग सोयाबीनकडून कपाशीच्या पिकाकडे वळला. त्यात यावर्षी कापसाचे पीकही उत्तम आले. परंतु ऐन पीक हाती येण्याच्या वेळेतच घात झाला आणि गुलाबी बोंडअळीने कापसाच्या बोंडावर तुफानी हल्ला चढविला. कपाशीच्या झाडावरील फुटण्यास तयार असलेली ६० ते ७० पक्की बोंडे अक्षरश: खराब झालीत. त्यामुळे कपाशीचा दर्जा घसरून उत्पादनात खूप मोठी घट झाली.
तालुक्यातील कापूस उत्पादकांच्या एकत्रित नुकसानीच्या ४५० कोटीच्या आकड्याला कृषी विभागाच्या अहवालाचा आधार आहे. जिल्हा कृषी विभागाच्या कृषी समितीने नोव्हेंबरमध्ये आपला अहवाल जाहीर केला आहे. त्या अहवालानुसार गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे एकरी १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तालुक्यातील कापूस पेऱ्याचा विचार करता व शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही लागले नसल्याचे चित्र आहे.
आर्थिक स्थिती खालावली
यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण गेला आहे. शेतकऱ्यांच्या हातून यंदा सुरुवातीच्या कमी पावसामुळे उडीद, मूग ही पिके हातून गेलीत. नंतर संत्रा फळगळीमुळे हेही पीक बुडाले. सोयाबीन पिकाने तर यावर्षी शेतकऱ्यांना अक्षरश: निराशा केली. त्यामुळे कधी नव्हे ती तालुक्यातील शेतकºयांची आर्थिक स्थिती यावर्षी खालावली आहे.

शेतकºयांची परिस्थिती बिकट आहे. अशावेळी मदतीला शासन धावून आले पाहिले. अन्यथा शेतकरी आत्मघाती निर्णयापर्यंत पोहचू शकतात. तेव्हा शासनाने त्वरीत मदतीचा निर्णय घ्यावा.
- बच्चू कडू,
आमदार, अचलपूर

Web Title: Cotton growers crush 450 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.