कापसाचे भाव पाडले

By admin | Published: November 18, 2015 12:16 AM2015-11-18T00:16:05+5:302015-11-18T00:16:05+5:30

यंदा अपुऱ्या पावसाअभावी सोयाबीन उद्ध्वस्त झाले. उत्पादन खर्चही निघाला नाही. उत्पन्न कमी असतानाही साडेतीन हजारांवर भाव चढला नाही.

Cotton prices were thrown | कापसाचे भाव पाडले

कापसाचे भाव पाडले

Next

शेतकऱ्यांसमोर नवे संकट : खासगीत ३,८०० वर स्थिरावला दर
अमरावती : यंदा अपुऱ्या पावसाअभावी सोयाबीन उद्ध्वस्त झाले. उत्पादन खर्चही निघाला नाही. उत्पन्न कमी असतानाही साडेतीन हजारांवर भाव चढला नाही. अशा स्थितीत सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढला तर शासकीय खरेदीही नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले. ग्रामीण भागात ३६०० ते ३८०० रूपयांनी कापसाची खरेदी केली जात आहे.
पणन महासंघाद्वारे जिल्ह्यात दिवाळीपूर्वी ७ नोव्हेंबरला अचलपूर येथील एकाच केंद्रावर कापसाची खरेदी सुरू झाली. सीसीआयची मंजुरी मिळाली नसल्याने अन्य केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया रखडली होती. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याशिवाय पर्याय नव्हता. या व्यापाऱ्यांनीही कापसाचे भाव पाडले. उत्पन्न कमी असल्यामुळे किमान पाच हजार रूपये क्विंटल भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना चार हजारांच्या आतच भाव मिळाला आहे.
जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून नापिकी आहे. खरिपाचे सोयाबीन पावसाअभावी खराब झाले. उभ्या पिकात शेतकऱ्यांनी नांगर फिरविला.

Web Title: Cotton prices were thrown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.