कपाशीचा पेरा घटणार, मिरची, वांगी, तुरीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:51+5:302021-06-16T04:17:51+5:30

पुसला : यंदाच्या हंगामात मृग पाऊस वेळेवर आल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामात नगदी पीक ...

Cotton sowing will be reduced, preference is given to chilli, brinjal, turi | कपाशीचा पेरा घटणार, मिरची, वांगी, तुरीला पसंती

कपाशीचा पेरा घटणार, मिरची, वांगी, तुरीला पसंती

Next

पुसला : यंदाच्या हंगामात मृग पाऊस वेळेवर आल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामात नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीचा पेरा घटणार असल्याचे दिसत असून, पर्यायी पीक म्हणून मिरची, तूर, भुईमूग , वांगीच्या लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे.

यंदाचा हंगामात मान्सून वेळेवर आल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, त्यांच्यात पेरणीकरिता उत्साह संचारला आहे. उसनवार, कर्ज घेऊन आर्थिक जुळवाजळव करून बियाणे खरेदी केले आहे. मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच पावसाने आगमन झाल्याने पेरणीस प्रारंभ झाला आहे. कपाशीचे पीक रोखीचे असले तरी ते महागडे झाल्यामुळे या पिकाला शेतकरी नापसंती दर्शवित आहेत. त्यामुळे परिसरात या पिकाचा पेरा घटणार असून, पर्याय म्हणून मिरची, वांगी,तूर, ज्वारी, भुईमूग या पिकांकडे शेतकरी वळले आहेत.

===Photopath===

140621\img_20210613_131956.jpg

===Caption===

पुसला परीसरात शेतात पेरणी करताना महीला मजूर वर्ग (छाया गजानन नानोटकर, पुसला )

Web Title: Cotton sowing will be reduced, preference is given to chilli, brinjal, turi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.