वृद्धांना खोकला, दमा, संधिवाताचा त्रास

By Admin | Published: January 19, 2016 12:11 AM2016-01-19T00:11:25+5:302016-01-19T00:11:25+5:30

हिवाळा लागला की तरुणांमध्ये उत्साह असतो. पण वृद्धांसाठी हे अच्छे दिन नसतात.

Cough, asthma, rheumatism, and chronic arthritis | वृद्धांना खोकला, दमा, संधिवाताचा त्रास

वृद्धांना खोकला, दमा, संधिवाताचा त्रास

googlenewsNext

वातावरणातील बदल ठरतोय घातक : काळजी घेण्याची गरज
संदीप मानकर अमरावती
हिवाळा लागला की तरुणांमध्ये उत्साह असतो. पण वृद्धांसाठी हे अच्छे दिन नसतात. त्यामुळे अमरावतीतील २५ टक्के वृद्धांना या दिवसांत खोकला, कप, दमा, संधिवात व श्वासोच्छवास या आजाराचा त्रास सहन करावा लागतो. वेळीच उपचार न केल्यास या आजाराचे इतर आजारामध्ये रुपांतर होऊ शकते व मृत्यूसुद्धा येऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे विषाणूजन्य तापाने रुग्ण फणफणतो आहे. खासगी रुग्णालयासह इर्विन, डफरीन, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात बाह्य व आंतर रुग्णांची संख्या हाऊसफुल्ल आहे.
वृद्ध रुग्णांना या दिवसांत पॅरालिसीस या भयंकर आजाराची शक्यता बळावते. या वयात त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांच्यावर इतर आजाराचे आक्रमण होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. वृध्दांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना आजाराची लक्षणे दिसू लागताच त्यावर उपचार करण्याची गरज असते. याकडे दुर्लक्ष केल्यास दुखणे बळावू शकते.

वृद्धांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन त्यांना लवकर होतो. ज्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा आजार आहे. नियमित तपासणी करून कंट्रोल ठेवावे.
- मनोज निचत,
हृदय व मधुमेह विकार तज्ज्ञ, अमरावती.

Web Title: Cough, asthma, rheumatism, and chronic arthritis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.