फिजिकल डिस्टन्सनुसार मतमोजणी टेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:08 AM2020-12-28T04:08:28+5:302020-12-28T04:08:28+5:30
कोरोना संसर्गामुळे प्रशासनाद्वारा खबरदारीचा उपाय अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या वेळी खबरदारी घेतली जाणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या ...
कोरोना संसर्गामुळे प्रशासनाद्वारा खबरदारीचा उपाय
अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या वेळी खबरदारी घेतली जाणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या फॉम्युल्यानुसार मतमोजणी टेबलचे नियोजन राहणार आहे. याशिवाय गर्दी टाळण्यासाठी कंट्रोल युनिटमधून निकाल मोठ्या स्क्रिनवर दाखविणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने संगितले.
मतमोजणी सभागृहात पुरेसे अंतर राखून मतमोजणीचे टेबल लावण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी मतमोजणी घेणे शक्य नसल्यास निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय मतांची मोजणी वेगवेगळ्या सभागृहात तसेच स्वतंत्र वेळ देऊन करू शकतात. मतमोजणी सुरू करण्यापूर्वी कंट्रोल युनिटची कॅरींगकेस सॅनिटाईज करण्यात येणार आहे. कंट्रोल युनिटचे सील तोडणे, त्यावरील निकाल दर्शविणे याकरिता प्रत्येक टेबलवर एकाच अधिकाऱ्याकडे व्यवस्था राहणार आहे.
मतमोजणीच्या आधी, मतमोजणीनंतर मतमोजणी केंद्रे निर्जंतुक केली जाणार आहे. पोस्टल बॅलेटच्या मोजणीसाठी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची आवश्यकता असल्याने पोस्टल बॅलेटदेखील निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र सभागृहात मोजली जाऊ शकतात आदी सुचना आयोगाद्वारा करण्यात आलेल्या आहेत.
बॉक्स
या वयोगटात शैक्षणिक पात्र
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवार २१ वर्षांहून कमी वयाची नसेल आीण तिचे मतदार यादीत नाव असेल जी १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असेल अशा उमेदवाराकडे किमान अर्हता म्हणून इयत्ता ७ वी उतीर्ण असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अशा उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत हे प्रमाणपत्र जोडावे लागणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.