मालखेड ते अंजनगाव बारी मार्गावर देशी दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:25 AM2019-10-15T01:25:30+5:302019-10-15T01:25:48+5:30

सापळा रचून दोन दुचाकीस्वारांना ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान १८० मिलि क्षमतेच्या ३८४ सीलबंद देशी दारूच्या बॉटल आणि दोन दुचाकी असे १ लाख ७ हजार ४६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भरारी पथकाने ही कारवाई विभागीय उपायुक्त एम.एस. वर्धे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक राजेश कावळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Country liquor was caught on the Malkhed to Anjangaon Bari route | मालखेड ते अंजनगाव बारी मार्गावर देशी दारू पकडली

मालखेड ते अंजनगाव बारी मार्गावर देशी दारू पकडली

Next
ठळक मुद्देदोन आरोपी, दोन दुचाकी ताब्यात : एक्साईज भरारी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मालखेड ते अंजनगाव बारी मार्गावर देशी दारूची अवैध वाहतूक करताना दोन आरोपींकडून ३८४ दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रविवारी केली.
पंकज खुशालराव पाटील (३०, रा. मालखेड, ता. अमरावती), हरीश प्रभाकरराव गावंडे (३२, रा. अंजनगाव बारी, ता. अमरावती) असे अटकेतील आरोपींची नावे आहे. एक्साइजने दिलेल्या माहितीनुसार, मालखेड ते अंजनगाव बारी मार्गावर नियमबाह्य दारूची वाहतूक होत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे सापळा रचून दोन दुचाकीस्वारांना ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान १८० मिलि क्षमतेच्या ३८४ सीलबंद देशी दारूच्या बॉटल आणि दोन दुचाकी असे १ लाख ७ हजार ४६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भरारी पथकाने ही कारवाई विभागीय उपायुक्त एम.एस. वर्धे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक राजेश कावळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. भरारी पथकाचे निरीक्षक जी.टी. खोडे, दुय्यम निरीक्षक कृष्णकांत पुरी, सुमीत काळे, सतीश बंगाळे, रूपेश मोकळकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अंतर्गत मार्गावर वाहनांची वर्दळ कमी असते. हल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारू वाहतूक जोरात सुरू झाली आहे.

एक्साईजचे धाडसत्र वाढले
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अलीकडे अवैध दारूविक्री, वाहतूक व साठवणूक प्रकरणी कारवाईने वेग घेतला आहे. अवैध दारूविक्रीविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. गत १५ दिवसांत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरंतर सुरू ठेवल्यास अवैध दारूविक्री, वाहतूक आणि साठा करण्यास पायबंद घालणे सुकर होईल, असे बोलले जात आहे.

Web Title: Country liquor was caught on the Malkhed to Anjangaon Bari route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.