वझ्झर डॅम पाहून परतणाऱ्या युगुलाला चाकूच्या धाकाने लुटले, चौघांना अटक

By प्रदीप भाकरे | Published: February 29, 2024 05:48 PM2024-02-29T17:48:50+5:302024-02-29T17:49:10+5:30

वझ्झर धरण ते मोहीफाटा रोडवर ही घटना घडली. याप्रकरणातील आरोपींना अवघ्या पाच तासात पकडण्यात परतवाडा पोलिसांना यश आले.

Couple returning from seeing Vazzar Dam robbed at knifepoint, four arrested | वझ्झर डॅम पाहून परतणाऱ्या युगुलाला चाकूच्या धाकाने लुटले, चौघांना अटक

वझ्झर डॅम पाहून परतणाऱ्या युगुलाला चाकूच्या धाकाने लुटले, चौघांना अटक

अमरावती: अचलपूर तालुक्यातील वझ्झर डॅम पाहून दुचाकीने गावी परतणाऱ्या युगुलाला चाकुच्या धाकावर लुटण्यात आले. अज्ञात पाच आरोपींनी त्या मित्र मैत्रिणीकडून दोन मोबाईल, रोख रक्कम व दुचाकी हिसकावून पळ काढला. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास वझ्झर धरण ते मोहीफाटा रोडवर ही घटना घडली. याप्रकरणातील आरोपींना अवघ्या पाच तासात पकडण्यात परतवाडा पोलिसांना यश आले.

अटक आरोपींमध्ये सलीम खान ऊर्फ कल्लू साबीर खान, शेख शाहीद ऊर्फ मोदू शेख राजीक, शेख सादिक ऊर्फ चिची शेख सलीम (सर्व रा. परतवाडा) व प्रणय रघुनाथ बादशे (रा. सराईपुरा, अचलपूर) यांचा समावेश आहे. आरोपींकडून फिर्यादीची दुचाकी, दोन मोबाईल, नगदी १६०० रुपये व गुन्ह्यात आरोपींनी वापरलेल्या दोन दुचाकी व चाकू असा एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आदित्य रामराव बर्वे (२३, रा. मेहराबपुरा ता. अचलपुर) हा मैत्रिणीसह वइझर डॅम परिसरात फिरायला गेला होता. तेथून परत येत असतांना मोहीफाटा रोडवर दोन दुचाकीवर आलेल्या पाच अज्ञात इसमांनी आदित्यची दुचाकी अडवली. त्याच्या मानेवर चाकू ठेवून त्याचा मोबाईल, नगदी १६०० रुपये तसेच त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. ते आदित्यची दुचाकी देखील घेऊन निघून गेले. त्याला मारहाणदेखील केली. याप्रकरणी, परतवाडा पोलिसांनी रात्री ११.४३ ला गुन्हा नोंदविला.

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ते गडंकी स्मशानभूमीकडे असल्याची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी गुरुवारी पहाटे सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक केली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली परतवाड्याचे प्रभारी ठाणेदार प्रदीप शिरसकार, उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, हवालदार सचिन होले, पोहवा, सुधिर राऊत, पोहवा, उमेश सावरकर, नापोकों, मनिष काटोलकर, जितेश बाबील, घनश्याम किरोले यांनी केली.

Web Title: Couple returning from seeing Vazzar Dam robbed at knifepoint, four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.