शाईफेक प्रकरणात रवी राणा यांना न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 08:07 PM2022-03-05T20:07:57+5:302022-03-05T20:08:19+5:30

मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्यावरील  शाइफेकीच्या प्रकरणात 307 च्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या आमदार रवी राणा यांना जिल्हा व सत्र न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे.

Court gives relief to Ravi Rana in ink throw case | शाईफेक प्रकरणात रवी राणा यांना न्यायालयाचा दिलासा

शाईफेक प्रकरणात रवी राणा यांना न्यायालयाचा दिलासा

Next

अमरावतीः मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्यावरील  शाइफेकीच्या प्रकरणात 307 च्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या आमदार रवी राणा यांना जिल्हा व सत्र न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस बी जोशी यांनी केला जामीन मंजूर केला. आभारताचे संविधान व न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून पोलिसांना तपासात आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी यावेळी प्रतिपादन केले. आपल्यावरील आरोप खोटे असून , शेवटी विजय सत्याचाच होईल, या संघर्षामयी काळात खंबीरपणे सोबत असणाऱ्या तमाम शिवप्रेमी, युवा स्वाभिमानी शिलेदार, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, हितचिंतक, प्रसार माध्यमे प्रतिनिधी, स्नेहीजनांचे आमदार रवी राणा यांनी आभार मानले.

हा आरोप पूर्णपणे सूडबुद्धीने केला असून,राजकीय विरोधकांच्या दबावात येऊन पोलीस प्रशासनाने आपल्याला यात अडकवले पण हा गुन्हा खारीज करण्यासाठी आपण उच्च न्यायालयात दाद मागू व उच्च न्यायालय निश्चितपणे आपल्याला न्याय देईल असा आशावाद आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे
आमदार रवी राणा यांचे वतीने ऍड प्रशांत देशपांडे,ऍड दीप मिश्रा,ऍड मोहित जैन,ऍड चंद्रसेन गुळसुंदरे,ऍड निखिल इंगळे, ऍड महेश करुले, व ऍड गणेश गंधे, ऍड रोशनी राऊत ऍड निरंजन राठोड, ऍड सुमित शर्मा,यांनी युक्तिवाद केला

Web Title: Court gives relief to Ravi Rana in ink throw case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.