आमदार रवी राणा यांचे न्यायालयाने नोंदविले बयाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:48+5:30
फ्रेजरपुरा पोलिसांत महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता नंदकिशोर तिखिले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार रवि राणा व नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविचे कलम ४४७, १८८, महाराष्ट्र म्युनिसिपालिटी अॅक्टचे कलम ३७ व १३५ मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला होता. हे प्रकरण प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक १ एस. ए. देशपांडे यांच्या न्यायालयात सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक यशोदानगर नजीकच्या बेनोडा येथील भीमटेकडीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कुठल्याही परवानगीविना बसविल्याप्रकरणी आमदार रवि राणा यांच्यासह नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात १४ एप्रिल २०१८ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी गुरुवारी अमरावती न्यायालयाने आमदार रवि राणा यांच्यासह इतर आरोपींचे बयाण नोंदविले. अंतिम युक्तिवादाकरिता न्यायालयाने १६ मार्च ही तारीख निश्चित केली आहे.
फ्रेजरपुरा पोलिसांत महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता नंदकिशोर तिखिले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार रवि राणा व नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविचे कलम ४४७, १८८, महाराष्ट्र म्युनिसिपालिटी अॅक्टचे कलम ३७ व १३५ मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला होता. हे प्रकरण प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक १ एस. ए. देशपांडे यांच्या न्यायालयात सुरू आहे. यापूर्वी सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने नोंदविली होती. आरोपींतर्फे वकील दीप मिश्रा, सी.बी. गोडसुंदरे, सुधीर तायडे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाचे वकील शर्मा हे आहेत.