कोरोना प्रतिबंधासाठी ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेविअर’ लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:26+5:302021-02-12T04:13:26+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सुसज्ज उपचार यंत्रणेसाठी आवश्यक खाटा, विलगीकरण क्षेत्रासाठी इमारती, औषधे आदी तजवीज तत्काळ ...

‘Covid Appropriate Behavior’ applied for corona restriction | कोरोना प्रतिबंधासाठी ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेविअर’ लागू

कोरोना प्रतिबंधासाठी ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेविअर’ लागू

Next

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सुसज्ज उपचार यंत्रणेसाठी आवश्यक खाटा, विलगीकरण क्षेत्रासाठी इमारती, औषधे आदी तजवीज तत्काळ करावी. वलगाव येथील विलगीकरण केंद्र सर्व सुविधांसह तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी येथे दिले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकारी नवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी विशाल काळे यांच्यासह कोरोनावर उपचार उपलब्ध असलेल्या विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

बाधितांचे मोठ्या प्रमाणावरील आकडे ही धोक्याची घंटा आहे. पुन्हा लॉकडाऊनची स्थिती उद्भवू नये, यासाठी आताच सर्वंकष प्रयत्न झाले पाहिजेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता खाटा, रेमडिसिविर व औषधे, ऑक्सिजनचा पुरेसा साठा ठेवावा. ‘अनलॉकिंग’च्या प्रक्रियेमध्ये काहीशी मोकळीक आली. रुग्णसंख्या कमी झाल्याने कमी झालेल्या सुविधा पूर्ववत सुरू कराव्यात. वलगावप्रमाणे आवश्यकतेनुसार व्हीएमव्ही संस्था व इतर ठिकाणीही विलगीकरण सुविधा पुरविली जाईल. अचलपूर येथेही खाटांची संख्या वाढवावी, असे निर्देश त्यांनी दिले. आवश्यकतेनुसार विलगीकरणासाठी शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था व इतर ठिकाणांची तजवीज करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

-------------

‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर देणार भर

लक्षणे नसलेल्या व गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून अनेकदा नियम पाळले जात नाहीत. अशांकडून संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई व्हावी. या व्यक्तींशी संबंधित यंत्रणेने नियमित संपर्क ठेवावा. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्यांकडून बंधपत्रही लिहून घेतले जात आहे. त्याचे काटेकोर पालन व्हावे. ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

-----------------

‘त्या’ रुग्णांचे नमुने पुणे येथे पाठविले

हवामानातील बदल, थंडीचे वाढलेले प्रमाण यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे कारण सांगितले जाते. संसर्ग हा एकदुसऱ्यापुरता मर्यादित न राहता अख्खे कुटुंब संक्रमित झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे या काळात लागण होण्याचे प्रमाण, विषाणूच्या संसर्गक्षमतेत वाढ आदी शास्त्रीय कारणे जाणून घेण्यासाठी त्याचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन- तीन दिवसांत प्राप्त होईल.

Web Title: ‘Covid Appropriate Behavior’ applied for corona restriction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.