कोविड पार्सल निरंतर सुरू, ‘यास’ वादळाचा फटका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:48+5:302021-05-25T04:13:48+5:30
अमरावती : अलीकडे तौक्ते, यास या वादळांमुळे होणारा जीवितहानीचा धोका टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. ...
अमरावती : अलीकडे तौक्ते, यास या वादळांमुळे होणारा जीवितहानीचा धोका टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. मात्र, कोरोनाकाळात शेतमाल, उद्याेजक, व्यापाऱ्यांच्या मालाची ने-आण करण्यासाठी एप्रिल २०२० पासून सुरू केलेल्या रेल्वे पार्सल कोविड स्पेशल गाड्या निरंतर सुरूच आहेत. या पार्सल सेवेने रेल्वेला उत्पन्न मिळवून दिले आहे.
मुंबई-शालिमार (००११३), शालिमार-मुंबई (००११४) आणि राजकोट ते शालिमार (००९१३), शालिमार ते राजकोट (००९१४) या रेल्वे पार्सल कोविड स्पेशल गाड्या आठवड्यातून तीन दिवस धावत आहेत. कोरोनाकाळात रस्ते वाहतुकीला निर्बंध आले असताना, रेल्वे मालवाहतुकीने शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक, व्यापाऱ्यांना मालाची ने-आण सुकर झाली आहे. राज्यातून देवळाली, लासलगाव येथील यार्डातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक याच रेल्वे पार्सल कोविड स्पेशल गाड्यांनी करण्यात येत आहे. बडनेरा, अमरावती मार्गे काचीगुडा एक्सप्रेसच्या पार्सल डब्यातून मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची वाहतूक होत आहे. रेल्वे पार्सल कोविड स्पेशल गाड्यांना एक्स्प्रेस रेल्वे स्थानकावरील थांबे देण्यात आले आहेत. ‘यास’ वादळाचा रेल्वे पार्सल कोविड मालवाहतूक गाडीला कोणताही परिणाम झाला नसल्याचे वास्तव आहे.
-------------------
अमरावतीत मागिवल्या औषधी, रेडीमेड कापड
अमरावती जिल्ह्यातील व्यावसायिक रेल्वे पार्सल कोविड स्पेशल गाड्यांतून औषधी, रेडीमेड कापड मागवित असल्याची माहिती आहे. होजिअरी मालाची आयात होत असून, शेतमालसुद्धा काही प्रमाणात मागविला जात आहे. बडनेरा येथील रेल्वे पार्सल कार्यालयाचे उत्पन्न ५० हजारांहून साडेसात लाख रुपयांवर पाेहोचले आहे.
---------------
यास वादळाचा रेल्वे पार्सल कोविड मालवाहतुकीला कोणताही परिणाम झाला नाही, ही गाडी निरंतर सरू असून, शेतकरी, व्यापारी, उद्योजकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
- एस. व्ही. चारदेवे, रेल्वे पार्सल प्रमुख, बडनेरा.