कोविशिल्ड १९ हजार, कोव्हॅक्सिनच्या १,२७० लसी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:08+5:302021-05-11T04:14:08+5:30

अमरावती : कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. गत तीन दिवसांपासून केंद्रावर लस उपलब्ध नव्हती. मात्र, सोमवारी दुपारी कोविशिल्डचे १९ ...

Covishield 19,000, received 1,270 vaccines for covacin | कोविशिल्ड १९ हजार, कोव्हॅक्सिनच्या १,२७० लसी प्राप्त

कोविशिल्ड १९ हजार, कोव्हॅक्सिनच्या १,२७० लसी प्राप्त

googlenewsNext

अमरावती : कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. गत तीन दिवसांपासून केंद्रावर लस उपलब्ध नव्हती. मात्र, सोमवारी दुपारी कोविशिल्डचे १९ हजार, तर कोव्हॅक्सिनच्या १,२७० लसी जिल्ह्यासाठी मिळाल्या आहेत. जिल्हा लस भांडार गृहातून लसींचे वितरण करण्यात आले असून, मंगळवारी केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. मात्र, दोन दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध असल्याची माहिती डीएचओ दिलीप रणमले यांनी दिली.

पुणे येथील आरोग्य संचालक कार्यालयांकडे सातत्याने लसींची मागणी केल्यानंतर तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील नागरिकांसाठी लस उपलब्ध झाली आहे. महापालिका, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात लस वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. कोविशिल्ड लस ही ४५ वर्षांवरील व्यक्तींना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिन लस हा दुसरा डोस दिला जाणार आहे. १८ ते ४४ वयाेगटातील तरुणांसाठी ८,७०० लसी प्राप्त असून, त्याचे नियोजन अगोदरच झाले आहे.

---------------

सोमवारी असे झाले लसींचे वाटप

अमरावती महापालिका : ५००० (१८०)

जिल्हा आरोग्य :१००० (१२०)

वरूड: १५०० (१४०)

अमरावती तालुका: १००० (७०)

भातकुली: ९०० (७०)

दर्यापूर: १००० (७०)

अंजनगाव सूर्जी: ८०० (७०)

अचलपूर: १५०० (७०)

चांदूर बाजार: १००० (७०)

चांदूर रेल्वे: ८०० (७०)

धामणगाव रेल्वे :१००० (७०)

तिवसा : ९०० (शून्य)

मोर्शी :१००० (७०)

नांदगाव खंडेश्वर :८०० (७०)

धारणी : ४०० (३०)

चिखलदरा :४०० (३०)

------------------------------

Web Title: Covishield 19,000, received 1,270 vaccines for covacin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.