पोळ्याच्या पूर्वसंध्येला गाय-बैलांना ठेवले कैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:21 PM2017-08-21T22:21:07+5:302017-08-21T22:22:03+5:30

न्यु नागझिरा अभयारण्यातील राखीव वनक्षेत्रात येणाºया तलावात बैल, गाई, शेळ्या पाणी पित असताना ....

Cows placed oxen on the eve of the hood | पोळ्याच्या पूर्वसंध्येला गाय-बैलांना ठेवले कैदेत

पोळ्याच्या पूर्वसंध्येला गाय-बैलांना ठेवले कैदेत

Next
ठळक मुद्देबाम्पेवाडा येथील प्रकरण : वनविभागाची अमानवीय कारवाई, वनकर्मचाºयांकडून गुराख्याला मारहाण

संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : न्यु नागझिरा अभयारण्यातील राखीव वनक्षेत्रात येणाºया तलावात बैल, गाई, शेळ्या पाणी पित असताना वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी तिथून आणून या सर्व जनावरांना बंदिस्त करून ठेवले. पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकारामुळे या गावातील नागरिकांना आज बैलाअभावी पोळा हा सण साजरा करता आला नाही. या प्रकारामुळे बाम्पेवाडा गावानजीकच्या लोणारा या गावात आज पोळ्याच्या दिवशी असंतोष पसरला होता.
दोन वर्षापूर्वी साकोली तालुक्यातील उमरझरी जंगलाला लागून असलेल्या जंगलाला न्यू नागझिरा अभयारण्य म्हणून शासनाने घोषित करण्यात आले. या अभयारण्याअंतर्गत बाम्पेवाडा व लोणारा या दोन्ही गावाच्या सिमेलगत रिसाला हे तलाव आहे. या तलावाचे पाणी शेतीच्या उपयोगासाठी लागू आहे. जनावरांसाठी मज्जाव करण्यात आला. पुर्वीपासून या तलावात गाई व म्हशी पाणी पिण्यासाठी ग्रामस्थ नेतात. न्यू नागझिरा अभयारण्य घोषित झाल्यापासून या तलावात जनावरांना नेण्यासाठी वनकर्मचारी गावकºयांना मज्जाव करतात.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे सर्वत्र पाणीटंचाई आहे. प्रत्येकच गावातील तलाव व बोड्यांमध्ये २५ ते ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लोणारा या गावातील गुराख्यांनी जनावरांना पाणी पिण्यासाठी संरक्षित जंगलातील रिसाला या तलावात नेले. याची माहिती वनविभागाला होताच वनअधिकारी ताफ्यासह पोहोचले व शंभराहून अधिक जनावरांना बाम्पेवाडा येथे आणून त्यांच्या वन कार्यालयासमोर असलेल्या प्रियदर्शनी समाज मंदिर परिसरात कोंडून ठेवले. मात्र ग्रामपंचायतची परवानगी घेतली नाही. त्यानंतर शेतकरी बाम्पेवाडा येथे जावून आज पोळा सण आहे, त्यामुळे आमची जनावरे द्या, अशी विनंती केली. मात्र वनविभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांचे काहीएक एैकूण घेतले नाही. परिणामी आज पोळा असल्यामुळे शेतकºयांनी वनविभागाच्या कार्यालयात एकच गर्दी केली.
या प्रकाराची चर्चा सर्वत्र वाºयासारखी पसरली. परिसरातील सर्व शेतकरी बाम्पेवाडा ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. यावेळी बाम्पेवाडाचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, वनक्षेत्राधिकारी व शेतकरी यांच्यात चर्चा झाली. मात्र वनअधिकारी कार्यवाहीवर अडून राहिले. शेवटी जि.प. सदस्य नेपाल रंगारी व शेतकºयांच्या मागणीवरून वनविभागाने ही जनावरे तीन वाजताच्या सुमारास गोपालकांना दिली. या दरम्यान गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोळा सणावर विरजण
पोळयाच्या सणाला एक दिवसाआधी म्हणजेच रविवारला मोहबैली हा सण होता. यादिवशी सायंकाळी बैलांचे खांदे शेकण्याची परंपरा आहे. दुसºया दिवशी पोळा हा सण साजला केला जातो. मात्र बैल घरी न आल्यामुळे शेतकºयांनी आपल्या बैलांना पोळयात नेलेच नाही.
चारापाण्याविना राहिली जनावरे
काल रविवार सायंकाळपासून ही जनावरे वनविभागाने आपल्या ताब्यात ठेवली. मात्र त्यांना चारा व पाण्याची सोय केली नाही. आज जनावरे चारण्यासाठी नेलेल्या उरकुडा शहारे रा.लोणारा गुराख्याला वनकर्मचाºयांनी काठीने मारहाण केली.
कैदेतच दिला गाईने वासराला जन्म
वनविभागाच्या कैदेत असतानाच एका गाईने रात्रीच्या सुमारास वासराला जन्म दिला. मात्र वनविभागाने याकडेही लक्ष दिले नाही. आणि गाईच्या मालकाला याची साधी सूचनाही दिली नाही.
ग्रामपंचायतची परवानगी नाही
वनविभागाच्या अधिकाºयांनी जनावरे कोंडवाडयात ठेवण्याऐवजी ही सर्व जनावरे बाम्पेवाडा येथील समाज भवनात कोंडून ठेवली. हे करताना ग्रामपंचायतची कुठलिही परवानगी मात्र घेतली नाही.

नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाºया जंगलात शासन नियमानुसार पाळीवप्राण्यांना आणण्यासाठी बंदी आहे. या नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
- राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक, न्यू नागझिरा.
आमच्या शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. जंगलातील वन्यप्राणी आमच्या शेताची मोठ्या प्रमाणात नासधुस करतात. परंतु या वन्यप्राण्यांना आम्हाला मारता येत नाही. दुसरीकडे यावर्षी अत्यल्प पावसामुळे पाणी नाही. अशास्थितीत आमची जनावरे जंगलात पाणी पिण्यासाठी गेली तर दंडात्मक कारवाई करण्यात येते. वनविभागाची ही कारवाई निषेधार्ह आहे.
- डॉ. नेपाल रंगारी, जिल्हा परिषद सदस्य.

Web Title: Cows placed oxen on the eve of the hood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.