सीपी संजयकुमार बाविस्कर यांना ‘उत्कृष्ट प्रशासक’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:04 PM2019-01-19T23:04:29+5:302019-01-19T23:04:47+5:30
शहर पोलीस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी चोख पार पाडणारे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३१ व्या महाराष्ट्र स्टेट पोलीस गेम्सदरम्यान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी चोख पार पाडणारे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३१ व्या महाराष्ट्र स्टेट पोलीस गेम्सदरम्यान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात रुजू झाल्यानंतर संजयकुमार बाविस्कर यांनी शिस्तपूर्ण व नियोजनबद्ध कामकाजाला प्राधान्य दिले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना कल्याणकारी योजनांचा व्यवस्थित लाभ मिळवून देण्याची प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना त्यांनी पार पाडली. डीजी कार्यालयाकडून मिळालेल्या निधीचा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी योग्य वापर केला. कर्मचाºयांचा भत्ता, रेल्वे वॉरंटची अंमलबजावणी वा कर्मचाऱ्यांच्या सुटीचा विषय, अशा प्रत्येक बाबीत पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी योग्य व्यवस्थापन केल्याचे आढळून आले.
डीजी कार्यालयाकडून दिलेल्या सूचना व नियमावली पालन करण्यात ते अव्वल ठरल्याने त्यांनी गुणानुक्रमे आघाडी घेतली होती. यामुळे राज्यभरातील पोलीस आयुक्तांपैकी अमरावतीचे संजयकुमार बाविस्कर यांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली होती.
उत्कृष्ट प्रशासक म्हणून सन्मान होण्यामागे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने कामकाज करण्यास बळ मिळाले. त्यामुळेच हा सन्मान मिळाला आहे.
- संजयकुमार बाविस्कर
पोलीस आयुक्त, अमरावती