पुन्हा तृतीयपंथींची सीपी, जिल्हाधिकारी कार्यालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:48+5:302021-03-25T04:14:48+5:30
अमरावती : आम्हीच असली तृतीयपंथी असून नकली तृतीयपंथीयांना मारहाणच केली नाही, तर त्या नकली तृतीयपंथीयांचा भांडाफोड करण्याकरिता आम्हीच त्यांना ...
अमरावती : आम्हीच असली तृतीयपंथी असून नकली तृतीयपंथीयांना मारहाणच केली नाही, तर त्या नकली तृतीयपंथीयांचा भांडाफोड करण्याकरिता आम्हीच त्यांना धडा शिकविला. चुकीचे निवेदन देऊन दिशाभूल करणाऱ्या त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमची माफी मागावी व पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी २० ते २५ तृतीयपंथी बुधवारी सीपी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.
एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नकली तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन दोन तरुणांना निंभोरा येथे नग्न करून त्यांचे केस कापले व मारहाण केल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना सादर निवेदनातून केला होता. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून, हा वाद पुन्हा पेटला. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जमा झालेल्या २० ते २५ तृतीयपंथीयांपैकी चार तृतीयपंथीयांना पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याकरिता सोडण्यात आले. त्यानंतर तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सीपी कार्यालयासमोर फ्रेजरपुरा पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.
बॉक्स
तरुणांना केले होते विवस्र
काही दिवसांपूर्वी नकली किन्नर असल्याचा आरोप करून दोन तरुणांना डान्स करण्याच्या बहाण्याने बडनेरा ठाणे हद्दीतील निंभोरा येथे बोलावून त्यांना नग्न करून मारहाण करीत डोक्याचे केस कापले. तसेच दोन तरुणांचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यानंतर दोन तरुणांनी बडनेरा ठाणे गाठून तक्रार नोंदविली याप्रकरणी चार तृतीयपंथीयांवर गुन्हा नोंदविला. . मात्र हा प्रकार गंभीर असल्याने व तरुणांचा नग्न व्हिडीओ व्हायरल केल्याने काही गंभीर गुन्ह्याच्या कलमांमध्ये पोलिसांनी वाढ केली. असूनकाही तृतीयपंथी आरोपींची संख्याही वाढ केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
बॉक्स:
आम्हाला अड्ड्याचा अर्थ सांगा
आम्हाला युवा लॉयन्स ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी फर्जी म्हटले.त्याचा अर्थ काय होतो?ते आम्हाला त्यांना विचारायचा आहे? तसेच आम्ही ज्या ठिकाणी राहता त्याला अड्डा म्हटल. एका मंदीराला जर अड्डा म्हटले जात असेल तर त्यांनी आमच्यासमोर याव त्याचा अर्थ आम्ही त्यांना विचारु. त्यांनी आम्हाला माफी मागावी. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करू असे चर्चे दरम्यान आम्हाला म्हटले त्यांनी जर कारवाई केली नाही. तर आम्हाला आमची कारवाई करावी लागले अशी प्रतिक्रीया एका तृतीयपंथीयांनी मीडियासमोर दिली.