इंधन दरवाढीचा भाकपने केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:01+5:302021-07-01T04:11:01+5:30

अमरावती : पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याशिवाय अन्य जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढले आहे. त्यामुळे ही ...

CPI (M) protests against fuel price hike | इंधन दरवाढीचा भाकपने केला निषेध

इंधन दरवाढीचा भाकपने केला निषेध

Next

अमरावती : पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याशिवाय अन्य जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढले आहे. त्यामुळे ही वाढती महागाई रोखण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवार, ३० जून रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक जिल्हा कौन्सिलच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्याच्या प्रमुख मागण्यांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरवर देण्यात येणारे अनुदान पुन्हा सुरू करावे, सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक बळकट करून सर्व व्यक्तींना रेशनव्दारा डाळी, खाद्य तेल, साखर, चहा मसाले आदी धान्य दहा किलोप्रमाणे द्यावे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करावी, देशातील सर्व नागरिकांना तातडीने कोरोना प्रतिबंधक लस मोफत द्यावी, असंघटित क्षेत्रातील सर्व श्रमिक कामगारांना पुढील सहा महिन्यांसाठी ७५०० प्रतिमहिना अर्थसहाय करावे आदी मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी तुकाराम भस्मे, सुनील मेटकर, जे.एम.कोठारी, अशोक सोनारकर, चंद्रकांत बानुबाकोडे, नीळंकठ ढोके, शरद मंगळे, नंदकिशोर नेतनराव, अशोक सिरसाठ आदींनी केली आहे.

Web Title: CPI (M) protests against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.