सीपींची रात्रकालीन गस्त, पाच अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:06 PM2017-08-28T23:06:14+5:302017-08-28T23:06:31+5:30
शहरातील गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक आता रस्त्यावर उतरले असून ....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक आता रस्त्यावर उतरले असून त्यांनी रविवारी दस्तुर नगर ते कंवरनगर मार्गावरील बार अॅन्ड रेस्टारेंटमध्ये धाड टाकून पाच गुन्हेगारांना अटक केली. रात्रकालीन गस्तीदरम्यान ४० संशयित दुचाकी पोलिसांनी 'डिटेन' केल्यात.
पोलीस आयुक्तांची सिंघम स्टाईलमुळे पोलीस वर्तुळाचे धाडसीवृत्ती जागृत झाल्याचे दिसून आले. पोलीस आयुक्तांच्या धडक कारवाईमुळे पोलिसांची ताराबंळ उडाली होती. आयुक्तच स्वत: रस्त्यावर उतरल्यामुळे अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनीही कर्तव्यदक्षतेचे उदाहरण दिले. पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी सर्वप्रथम गजल बारवर धाड टाकून बारमधील ग्राहकांची चौकशी केली. यावेळी बारमध्ये पाच गुन्हेगार मद्यप्राशन करताना आढळून आले. पोलिसांनी पाचही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यामधील काही जण हे रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस आयुक्तांनी रस्त्यावरून जाणाºया वाहनांची तपासणी करण्याचे पोलिसांना निर्र्देश दिले. यामध्ये विना क्रमाकांची काही दुचाकी पोलिसांनी 'डिटेन' केल्यात. या कारवाईत डीसीपी शशिकांत सातव, राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी, एपीआय राम खराटे, गुन्हे शाखेचे एपीआय गवंड, पाटील, पीएसआय राम गिते, राजेंद्र चाटे यांच्यासह आदी पोलीस उपस्थित होते.
फे्रजरपुरा हद्दीत 'रुटमार्च'
सण-उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सोमवारी शहरातील काही भागांत 'रुटमार्च' काढला. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या नेतृत्वात शेकडो पोलीस कर्मचाºयांनी शिस्तीचे उदाहरण देत शहरात गस्त घातली. फे्रजरपुरा हद्दीत १० अधिकारी व १०० पोलीस कर्मचारी पथसंचलनात सहभागी झाले होते. असाच रुटमार्च २९ आॅगस्ट रोजी कोतवाली, ३० आॅगस्ट रोजी राजापेठ व ३१ आॅगस्ट रोजी भातकुली ठाण्याच्या हद्दीत काढण्यात येणार आहे.