हिमालय ओलांडून क्रौंच पक्षी अमरावतीत दाखल
By Admin | Published: January 31, 2015 12:56 AM2015-01-31T00:56:11+5:302015-01-31T00:56:11+5:30
यंदाच्या हिवाळ्यात विदेशी पक्ष्यांची रेलचेल जिल्ह्यातील विविध तलावांवर पाहायला मिळाली आहे. नुकताच हिमालय ओलांडून क्रौंच पक्षी...
अमरावती : यंदाच्या हिवाळ्यात विदेशी पक्ष्यांची रेलचेल जिल्ह्यातील विविध तलावांवर पाहायला मिळाली आहे. नुकताच हिमालय ओलांडून क्रौंच पक्षी अमरावती जिल्ह्यातील एका तलावावर आढळला आहे. मात्र तलावावरील प्रदूषित वातावरणामुळे या स्थंलातरित पक्षांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.
पक्षी तज्ज्ञ कृष्णा खान यांनी नुकताच जिल्ह्यातील विविध तलावांवर भ्रंमती करुन पक्षी निरीक्षण केले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध तलावांवर स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आढळून आला आहे. त्यातच सायबेरियन, रशियन प्रांतातून हिमालय ओलांडून आलेले क्रौंच पक्षीसुध्दा एका तलावावर आढळून आल्याने पक्षीमित्रांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. मात्र एकीकडे अमरावती जिल्ह्यातील तलावांवर वाढते प्रदूषण स्थंलातरित व स्थानिक पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण करीत असल्याचे मत पक्षीप्रेमींचे आहे. जिल्ह्यात वाढते औद्योगिकीकरण, अवैध मासेमारी आणि कीटकनांशकाचा अति वापरामुळे पक्षांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागिल काही वर्षांच्या तुलनेत यंदा स्थंलातरीत पक्षांंमध्ये मोठी घट दिसून आल्याचे मत पक्षी तज्ज्ञांचे आहे. साधारणात आॅक्टोबर महिन्यात स्थंलातरित पक्षी जिल्ह्यातील तलावांवर येतात व फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत परतीच्या प्रवासाला लागतात. आता स्थंलातरित पक्षांचा परतीचा प्रवास सुरु झाला असून प्रवासावेळीच क्रौंच पक्षी तलावावर आढळून आला आहे, हे विषेश. (प्रतिनिधी)