समतेचा समाजधर्म निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:32+5:302021-04-15T04:12:32+5:30
स्थानिक फुले-आंबेडकर प्रबोधन मंचतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तत्त्वज्ञानावर ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली, त्यावेळी ते ...
स्थानिक फुले-आंबेडकर प्रबोधन मंचतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तत्त्वज्ञानावर ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली, त्यावेळी ते अध्यक्षस्थाहून बोलत होते. यावेळी देश-विदेशातील विचारवंत अंनिसचे पुणे येथील हमिद नरेंद्र दाभोलकर, अभियंता पायल पराग मेहरे (मस्कत ओमान), भीमराव चंदनकर, अनंत वाठोडकर, निशा शेंडे, आनंद देशमुख, अंकुश पारवे आदींनी आज आंबेडकर असते तर ते आजच्या धर्मांध व्यवस्थेविरुद्ध परिवर्तनासाठी पेटून उठले असते. अलिकडे हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी पावले पडताना दिसत आहेत. पण, देशातील पददलित जाती-जमातीवर गेली हजारो वर्षे अन्याय, अत्याचार होत आले असतानाही दलितांनी कधी ‘दलितस्तान‘ची मागणी केली नाही. विविध वंश, अनेक धर्म, शेकडो पंथ, हजारो जाती यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावेत, हीच शिकवण डॉ. आंबेडकरांनी दिल्याचे ते म्हणाले. जनसंपर्क अधिकारी प्रभाकर वानखडे यांनी फुले-आंबेडकरांचे साहित्य केंद्र व राज्य सरकारने पुनर्प्रकाशित करून उपलब्ध करण्याची मागणी यावेळी केली. प्राचार्य तुकाराम दहिवाडे यांनी प्रास्ताविक, प्रभाकर वानखडे यांनी संचालन व प्रवीण खांडवे यांनी आभार प्रदर्शन केले.