४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली वसुंधरा

By admin | Published: April 22, 2017 12:25 AM2017-04-22T00:25:46+5:302017-04-22T00:25:46+5:30

अन्न, वस्त्र व निवारा देणारी पृथ्वी आपले संतुलन ठेवते. २२ एप्रिल हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो

Created 4.50 billion years ago, Vasundhara | ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली वसुंधरा

४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली वसुंधरा

Next

अमरावती : अन्न, वस्त्र व निवारा देणारी पृथ्वी आपले संतुलन ठेवते. २२ एप्रिल हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो. अशी ही वसुंधरा ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. पृथ्वीचे वयोमान मोजण्याची वैज्ञानिक पद्धती युरेनियम डेटींग आहे. युरेनियम २३८ या किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या अर्धे आयुष्याच्या काळावरून पृथ्वीचे वय काढले आहे. सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाच्या या ग्रहावर फक्त जीवसृष्टी आहे.
१९७० साली सर्वप्रथम सॅनफ्रॉन्सिस्को (अमेरिका) येथे अर्थ डे साजरा करण्याचे ठरले. तेव्हापासून २२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. अमेरिकेचे गेलॉर्ड नेल्सन हे वसुंधरा दिवसाचे जनक होय. अनंत काळापूर्वी भ्रमणादरम्यान ग्रहमालेतील एक ग्रह सूर्यावर आदळून त्यापासून मोठा तप्त गोळा वेगळा झाला. कालांतराने तो थंड झाला व त्यावर जीवसृष्टी निर्माण झाली, असे वैज्ञानिकांचे मत आहे.
दरवर्षी पृथ्वीला सुमारे १० लाख भूकंपाचे धक्के बसतात. त्यातील काही सूक्ष्म असतात. सन २००४ मध्ये झालेल्या त्सूनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग ३ मायक्रोसेकंद कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चाललेला आहे. दर १ लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमीटर ओढली जात आहे. दरवर्षाला चंद्र सुद्धा पृथ्वीपासून ३.८ सें. मी. लांब जात आहे. त्यामुळे १०० वर्षांनी दिवस हा २ मिलीसेकंदाने मोठा होईल. ५ खंडसुद्धा हळूहळू सरकत आहे. न्यूयॉर्क शहर दरवर्षाला लंडनपासून २.५ सें. मी. दूर जात आहे.
पृथ्वीचे तापमान वाढत चाललेले आहे. पृथ्वीचा समतोल ढासळत चाललेला आहे. हे तापमान असेच जर वाढले तर भविष्यात मनुष्य व इतर जीवसृष्टी नष्ट होईल, पृथ्वीला आणखी एक मोठा धोका म्हणजे भविष्यात "स्वीप्टटटल" या अवाढव्य धूमकेतूची पृथ्वीशी टक्कर होईल, यामुळेसुद्धा पृथ्वीच्या बऱ्याच भागाची हानी होईल. २१ जुलै १९९४ रोजी शुमेकरलेव्ही या धुमकेतूने गुरू ग्रहाला टक्कर दिली होती.
या वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल, तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे जरूरी आहे. नाही, तर ही वसुंधरा आपल्याला कधीच माफ करणार नाही. या वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी विद्यार्थ्यांनी पृथ्वीला वाचविण्यासाठी कोणतातरी एक चांगला संकल्प करावा व तो प्रत्यक्षात आचरणात आणावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अभ्यासक विजय गिरूळकर व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.

 

Web Title: Created 4.50 billion years ago, Vasundhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.