राज्यात १०० अटल आनंदवनांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 09:16 PM2019-05-29T21:16:35+5:302019-05-29T21:17:10+5:30

राज्यातील नगर परिषद, महापालिकांच्या ओपन स्पेसवर जपानमधील मियाबाकी जंगलाच्या धर्तीवर १०० अटल आनंदवनांची निर्मिती केली जाणार आहे.

The creation of 100 Atal Anandvana in the state | राज्यात १०० अटल आनंदवनांची निर्मिती

राज्यात १०० अटल आनंदवनांची निर्मिती

googlenewsNext
ठळक मुद्देजपानमधील मियाबाकी धर्तीवर संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यातील नगर परिषद, महापालिकांच्या ओपन स्पेसवर जपानमधील मियाबाकी जंगलाच्या धर्तीवर १०० अटल आनंदवनांची निर्मिती केली जाणार आहे. नागरिकांसाठी ती ऑक्सिजन पार्क असतील, तर पशूपक्ष्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंदवन राहणार असल्याची माहिती राज्याचे वन, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
योजनेसाठी काही नगरपालिका पुढे आल्या आहेत. यामध्ये एक हेक्टर जागेत १२ हजार ५०० वृक्ष लागवड केली जाते. मंत्रिमंडळाची याला मान्यता देण्यात आलेली आहे. या वनासाठी मियाबाकी टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवनात ही संकल्पना सर्वप्रथम यशस्वी केली. आता राज्यात याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी समाजाने घ्यावी, यासाठी हरित सेना (ग्रीन आर्मी) ही संकल्पना आहे. यासाठी एक कोटींचे लक्ष्य आहे. सद्यस्थितीत ६० लाखांवर नोंदणी झालेली आहे. अमरावती विभागात १२ लक्ष उद्दिष्ट असताना, २७ मेपर्यंत ९,३८,५४६ नोंदणी झालेली आहे. यंदा १ ते ३१ जुलै या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्यांक आहे. मागील वर्षी १३ कोटी वृक्षलागवड करण्यात आली. यापैकी ८७.८५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.
वृक्षलागवडीवर मॉनिटरिंंग करण्यासाठी नागपूर येथे कमांड रूम स्थापित करण्यात आलीे. देशाच्या निधी आयोगाने याचे कौतुक केले आहे. देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत फॉरेस्ट सर्र्व्हेे ऑफ इंडियाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर आहे. वनेतर क्षेत्रामध्ये वृक्षाच्छादन २७३ चौरस किमीने वाढले आहे. कांदळ वनक्षेत्रामध्ये ८२ चौरस किमीने वाढ झालेली आहे. कोणत्याही विभागाच्या नियत व्ययातून ०.५ टक्के निधी वृक्षसंवर्धनासाठी वापरण्यास मुभा दिलेली आहे. आमदारदेखील या मिशनसाठी निधी उपलब्ध करू शकतात. जिल्हा नियोजनमधील विशिष्ट निधी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने जिल्ह्याधिकारी देऊ शकतात, असे मुनगंटीवार म्हणाले. पत्रपरिषदेला पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुनील देशमुख, आमदार रमेश बुंदिले, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य संरक्षक अनुराग चौधरी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल व वनविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

‘त्या’ वृक्षाच्या कलमा शहीद स्मारकात लावणार
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे हे १५० वे वर्ष आहे. वर्धेच्या कर्मभूमीतील सेवाग्राममध्ये गांधीजी साबरमती आश्रमापेक्षा जास्त काळ राहिले. या आश्रमात १९३९ मध्ये एक वृक्ष त्यांनी स्वहस्ते लावला होता. त्या वृक्षाच्या कलमा तयार करण्यात आल्यात. या कलमा आता राज्यातील ३३ कोटी वृक्षलागवड अंतर्गत प्रत्येक शहीद स्मारकात लावणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

अमरावती, अकोला विमानतळासाठी निधी
अमरावती विमानतळाचे नाइटलॅन्डिंंग व रनवे यासाठी निधी उपलब्ध करणार आहोत. अमरावती येथे भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षणासाठी दोन वर्षांत १६ कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयास पुरवणी व डिसेंबरमध्ये २५ कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

Web Title: The creation of 100 Atal Anandvana in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.