सत्यशोधक साहित्यातून सृजनशील जीवनदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:49 PM2017-11-29T22:49:34+5:302017-11-29T22:50:06+5:30

राज्यातील बहुजनवादी विचारवंत, साहित्यिकांची मांदियाळी वरूडात जमली असून नव्या समाजाची दिशा कशी असावी, परिवर्तणवादी विचार समाजात कसा रुजवावा यावर विचारमंथन सुरू आहे.

Creativity from Satyashodak literature | सत्यशोधक साहित्यातून सृजनशील जीवनदृष्टी

सत्यशोधक साहित्यातून सृजनशील जीवनदृष्टी

Next
ठळक मुद्देदुसरे सत्यशोधक साहित्य संमेलनाचे उद्घाटन : अनेक विचारवंतांची हजेरी

आॅनलाईन लोकमत
वरूड : राज्यातील बहुजनवादी विचारवंत, साहित्यिकांची मांदियाळी वरूडात जमली असून नव्या समाजाची दिशा कशी असावी, परिवर्तणवादी विचार समाजात कसा रुजवावा यावर विचारमंथन सुरू आहे. या विचारप्ीाठाचे औचित्य आहे दुसऱ्या सत्यशोधक साहित्य संमेलनाचे. या समेलनाच्या उद्घाटनाला सत्यशोधक साहित्य जीवनदृष्टी देते, ही दृष्टी विध्वंसक नसून सृजनशिल आहे, असे मत विचारवंतांनी उद्घाटनप्रसंगी नोंदविले.
सत्यशोधक फाउंडेशनच्यावतीने दुसरे सत्यशोधक साहित्य संमेलनाचे स्थानिक माधवराव काठीवाले सभागृहात नगराध्यक्ष स्वाती आंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे होते. विचारपीठाचे स्वागताध्यक्ष मनोहर आंडे, अशोक बोडखे, बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, जिल्हा परिचदेचे समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे, विक्रम ठाकरे, अंजनगावचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार आशिष बिजवल उपस्थित होते. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची देवाण-घेवाण करून बहुजन समाजाला नवी दिशा देणे गरजेचे असल्याचे मत या संमेलनात व्यक्त करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून चंद्रकांत वानखडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरत त्यांनी शासनावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, सत्यशाोधक साहित्य संमेलनामध्ये बदलत्या परिस्थीतीवर चर्चा करून संवाद घडावा. नवीन विषयाला स्वीकारताना स्वत:मध्ये काय बदल करावा, याचे आत्मपरीक्षण बहुजन समाजाने करणे गरजेचे आहे. जो समाज चिकित्सा करतो, आत्मपरीक्षण करतो तोच दोषमुक्त होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले.
साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात मुंबई येथील सचिन परब, यवतमाळचे इतिहास संशोधक अशोक राणा यांनी विचार मांडले. दुसºया सत्रात अमरावतीचे डॉ. गणेश हलकारे व अनिसचे राज्य संघटक दिलीप सोळंके यांनी विचार मांडले. समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, जगदीश काळे, प्रवीण चौधरी, विनय फरकाडे, दिलीप भोयर, किशोर भगत, महेंद्र भातकुले, नितीन खेरडे आदी उपस्थित होते.

Web Title: Creativity from Satyashodak literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.