विनाकारण फिरणाऱ्या ६२ नागरिकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:01+5:302021-04-17T04:13:01+5:30

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश असतांनाही विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह ...

Crime against 62 citizens wandering without any reason | विनाकारण फिरणाऱ्या ६२ नागरिकांवर गुन्हा

विनाकारण फिरणाऱ्या ६२ नागरिकांवर गुन्हा

Next

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश असतांनाही विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी ६२ नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर ८८० वाहनचालकांवर कारवाई करून २ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.

या कारवाईत सर्वाधिक २५ एफआयआर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले. गाडगे नगरात १५, राजापेठ ११, फ्रेजरपुरा ९, नागपुरी गेट २ गुन्हे दाखल केले आहेत.

बॉक्स:

आतापर्यंत १०१७ नागरिकांविरुद्ध एफआयआर

पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशानुसार शहर पोलीस कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द तीन महिन्यांपासून कारवाई करत आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत १६ एप्रिलपर्यंत १०१७ नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. विनाकाराण शहरात वाहन फिरविणाऱ्या विरोधात २४ हजार ४३० केसस करण्यात आले, २ कोटी १२ लाख ११०० रुपये जप्त केले आहेत. त्यामुळे वर्ष २०२० मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या दरम्यान १०२० नागरिकां विरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बॉक्स:

गाडगे नगरात सर्वाधिक कारवाई

गाडगे नगर पोलीस स्टेशन क्षेत्रात शुक्रवारी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. ठाणेदार आसाराम चोरमले यांनी फिक्स पॉइँटवर उभे राहून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. फ्रेजरपुरा, राजापेठ, सिटी कोतवाली ठाणे अंतर्गतसुद्धा कारवाया करण्यात आल्या.

Web Title: Crime against 62 citizens wandering without any reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.