आंदोलन शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:13 AM2021-04-01T04:13:58+5:302021-04-01T04:13:58+5:30
अमरावती : होळीत चपलांचा हार जाळून धार्मिक भावना दुखावल्याने खासदार व आमदार यांच्याविरुध्द गुन्हे नोंदविण्यात यावे, अशी मागणी मंगळवारी ...
अमरावती : होळीत चपलांचा हार जाळून धार्मिक भावना दुखावल्याने खासदार व आमदार यांच्याविरुध्द गुन्हे नोंदविण्यात यावे, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणबाजीने केली होती. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी पराग गुडधे, सुनील खराटे, प्रदीप बाजड, वर्षा भोयर, आशिष धर्माळे यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांविरुध्द संचारबंदी उल्लंघनासह आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.
0000000000000000000000000000000000000000
मटन विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती : सार्वजनिक रस्त्यावर मटन विक्री करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने वलगाव पोलिसांनी मंगळवारी एका मटन विक्रेत्याविरुध्द भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविला. सुरेश भाऊराव लोणारे (५३ रा. शिराळा) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय गिते यांचे पथक शिराळा रोडवरील बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, सदर प्रकार निदर्शनास आला. यावरून मटणविक्रेत्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
000000000000000000000000000000
संशयित आरोपीला अटक
अमरावती : गुन्ह्याच्या उद्देशाने अंधारात लपून बसलेल्या एका संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी मंगळवारी बसस्थानक परिसरातून अटक केली. शाहरुख अली हारुण अली (२० रा. अकबरनगर) असे आरोपीचे नाव आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक भारती इंगोले यांचे पथक बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना शाहरुख अली हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला.