धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालकांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 01:23 AM2019-07-14T01:23:07+5:302019-07-14T01:25:07+5:30

सुमारे २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Crime against the Chairman of Dhamangaon Market Committee, Directors | धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालकांविरुद्ध गुन्हे

धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालकांविरुद्ध गुन्हे

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । शेतकऱ्यांची योजना स्वत: लाटली; वारेमाप खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सुमारे २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शेतमाल तारण कर्ज शेतकऱ्यांना न देता स्वत: वापरणे, प्रवास भत्ता अधिक उचलणे तसेच शेतकऱ्यांच्या भोजनालयावर अधिक खर्च दाखवून हा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
धामणगाव रेल्वे येथील कृषिउत्पन्न बाजार समितीचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यात आले. जिल्हा विशेष लेखापरीक्षक अशोक माकोडे यांनी त्या लेखापरीक्षणात अत्यंत गंभीर मुद्दे उजेडात आणले. संचालक मंडळाने काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तब्बल २ कोटी ९९ लाख रुपयांची आर्थिक अफरातफर केल्याचा ठपका अशोक माकोडे यांनी ठेवला. आठवड्यापूर्वी त्यांनी दत्तापूर पोलीस ठाणे गाठून फौजदारी तक्रार नोंदविली.
शेतमाल तारण कर्ज शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असताना २ कोटी ८२ लाख रुपये संचालक मंडळ व इतर शेतकºयांच्या नावाने दाखवून तारण कर्जाची अफरातफर करण्यात आली. सभापतींनी १ लाख २४ हजार रुपये प्रवास भत्ता दाखवून त्यामध्ये गैरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांसाठी असलेले भोजनालय अनधिकृतपणे चालवून त्यावर २ लाख १५ हजार रुपयांचा खर्च दाखवण्यात आला. यासंदर्भात जिल्हा विशेष लेखापरीक्षक अशोक माकोडे यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार दत्तापूर पोलिसांनी शनिवारी कृषिउत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती मोहन इंगळे, उपसभापती दुर्गाबक्षसिंह ठाकूर, सचिव प्रवीण वानखडे, लेखापाल प्रेमशंकर पांडे, कर्मचारी संजय तुपसुंदरे, संचालक रामदास निस्ताने, दिलीप लांबाडे, रवींद्र ठाकरे, नंदकिशोर ढोले, विजय गुल्हाने, स्नेहल जायले, प्रीती हांडे, श्रीकांत गावंडे, प्रशांत सबाने, मनोज कडू, निरंजन देशमुख, अविन टेकाडे, बबन मांडवगणे, रमेश राठी, सत्यनारायण लोया, विशाल पोळ या संचालकांविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४०८, ४०९, ४६८, ४६९, ४७१, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रकरणाचा पुढील तपास दत्तापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र सोनवणे यांच्याकडून होत आहे.

ज्या योजनेसाठी पुरस्कार त्यातच गैरव्यवहार
तारण योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणाºया धामणगाव बाजार समितीतच त्याच योजनेत कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला. भाजपशासित या बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणी सहकार विभागाने जूनच्या पहिल्या आठवड्यात सभापती यांच्यासह २२ संचालकांना नोटीस बजावत १५ दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, तारण योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली, या निकषांच्या आधारेच बाजार समितीला पुरस्कृत करण्यात आले होते.

Web Title: Crime against the Chairman of Dhamangaon Market Committee, Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार